कवीमनाचा माणचा आमदार धोंडीराम वाघमारे.




व्यक्ती विशेष.. आ. धोंडीराम वाघमारे.


"सामान्य जनतेचा आधार,
अष्टपैलू कवीमनाचा राजकारणी '
आपण आज अशा एका राजकिय नेत्याचे जीवन चरित्र पाहणार आहोत. गरिब लोकांना मदत करणारा व सामाजिक भान असणारे व्यक्तीमत्व, माणच्या दुष्काळी भागातील कवी ..
माण तालुक्यातील जनतेचा कैवारी'
स्व.मा.आ.धोंडीराम वाघमारे....
माणूस जन्माला येतो आणि मरतो, पण काही अशी माणसे असतात ,की ते मृत्यूनंतर पण जगत असतात. लोकांच्या ह्रदयात!..
आपल्या कार्याने, आपल्या आठवणीने अशी माणसं लोकांमध्ये जगत असतात. त्यांच्या आठवणी मूळेच ते नेहमीच माणसाच्या हृदयामध्ये घर करून बसलेले असतात. माण या दुष्काळी तालुक्यामध्ये असेच एक व्यक्तिमत्त्व राजकीय क्षेत्रामध्ये होऊन गेलं .
त्यांनी सामाजिक, साहित्यिक, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपलं कार्य कर्तुत्व दाखवलं .
खरं तर अशा व्यक्ती फार दुर्मिळ असतात 2015 साली नुकतेच त्यांचे निधन झालं. आणि एक माण तालुक्यातले सामाजिक एक नेतृत्व हरपले. माण तालुक्यातील विचावंत लोकांचा आधार स्तंथ गळून पडला. जणू माण तालुक्यातील गरीब, काही र्यकर्ता पोरका झाला.
जीवाला जीव देणारा गरीब लोकांना सखा हरविला.
सतत हसतमुख असणारा व्यक्ती हरपला.
हा व्यक्ती म्हणजे माननीय स्वर्गीय आमदार धोंडीराम जी वाघमारे होय.
माण  या दुष्काळी तालुक्यामध्ये वडजल  या गावांमध्ये एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये या व्यक्तीचा जन्म झाला. लहानपणी अतिशय हुशार आणि तल्लख होते.
लहानपणीचे शाळेचे शिक्षण कसे बसे त्यांनी वडजल मध्ये पूर्ण केलं त्यानंतर ते म्हसवड मध्ये काही काळ मामा शंकरराव सरतापे यांच्या कडे राहिले.
म्हसवडमध्ये त्यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. याकाळत त्यांनी अनेक मित्र जोडले.
आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले.
मुंबईमध्ये त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं. हे करत असताना विविध अंगांनी त्यांनी सामाजिक काम केल.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची त्यांना प्रेरणा मिळाली या प्रेरणेतून त्यांनी माननीय शरद पवार यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या बरोबर सामाजिक काम केलं .
या कामातूनच त्यांची ओळख माण तालुक्याचे किंगमेकर समजले जाणारे त्याकाळचे धुरंदर माननीय माजी आमदार सदाशिवराव पोळ यांची भेट झाली माण हा तालुका विधानसभेसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित होता. या काळामध्ये माण तालुक्याला एक प्रतिभावंत आमदार मिळावा या उद्देशाने माननीय सदाशिवराव पोळ यांनी धोंडीराम वाघमारे यांना माण- फलटण विधानसभा मतदार संघातून  प्रथम अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उद्युक्त केलं आणि 1991 साली पहिल्यांदा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.
यानंतर 1995 ला दुसऱ्यांदा ते अपक् आमदार  म्हणून विधानसभेसाठी निवडून आले.
या काळामध्ये माण च्या लोकांच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या आणि माण या  दुष्काळी तालुक्याला पाणी मिळावं.
येथील लोकांच्या ,शेतकऱ्यांच्या व्यथा संपणविण्यासाठी त्यासाठी विशेष योजना तयार केल्या. माण सुजलाम सुफलाम
करण्याचे स्वप्न मनामध्ये होतं. त्यांच्या
मनातलं  हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सतत काम करीत होते.
आणि ते स्वप्न काही अंशतः पूर्ण केलं. दरम्यानच्या काळामध्ये युती सरकारमध्ये असतानासुद्धा जिहे-कठापूर ,उरमोडी या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आर्थिक, सामाजिक,सहकार, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी अलौकिक असं काम केलं.
सर्वसामान्य कार्य कर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी औद्योगिक संस्था निर्माण करणे. सहकारी संस्था निर्माण करणे.
याचबरोबर विविध कलाकारांना  प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी साहित्य संमेलन त्यांनी दहिवडीत भरवलं होत.  माण तालुक्यातील कलाकारांना एकत्र करून वृद्ध कलाकारांना मानधन देण्यासाठी सरकारी दरबारी प्रयत्न केले.
माण तालुक्यातील जे कलाकार आहेत मानदेशी कलाकार आहेत धनगरी ओव्या म्हणणारे कलाकार आहेत .
या लोकांना मानधन मिळवून दिलं.
संजय गांधी , इंदिरा गांधी निराधार योजना आणि अपंग कल्याणकारी योजना त्यांनी माण तालुक्यासाठी विशेष करून राबवल्या .झुणका भाकर ही कल्पना शासन दरबारी मांडली.
याच काळात त्यांनी हुंदका नावाचा एक काव्यसंग्रह लीहला.
या हुंदका काव्यसंग्रह मधून त्यांनी दुष्काळी तालुक्यातल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
मनाने श्रीमंत असणारा हा कवी मनाचा मनुष्य आज आपल्यात नाही.
मात्र त्यांनी केलेलं काम हे जनतेच्या हृदयामध्ये आहे.
अतिशय सामान्यातील कुटुंबात जन्माला आलेला हा व्यक्ती आयुष्यभर सर्वसामान्य माणसांच्या उद्धारासाठी झटला .
त्यांनी केवळ आणि केवळ गरीब आणि आर्थिक दुर्बल लोकांना आर्थिक सक्षम बनविण्याचा मोठा कार्य केलं होतं .
विविध क्षेत्रामध्ये त्यांचे मित्र होते.मात्र या मित्रांना त्यांनी कधीच दुरावलं नाही गरीबातला गरीब रस्त्यावर फिरणारा साहित्यिक आणि मुकेश अंबानी सारखे किंवा अनिल अंबानी सारखे त्यांनी मित्र जोडले होते. खा. प्रतापराव भोसले व यशवंतबुवा साहेब माने यांना ते गुरुस्थानी मानत असतं. आ.शालिनीताई पाटील,वसंतदादा पाटील हे त्यांचे प्रेरणादायी व्यक्ती होत्या.
मा. गृहमंत्री स्व. आर.आर.पाटील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, स्व. खा. हिंदुराव नाईक निंबाळकर, संजीव राजे नाईक निंबाळकर, आ.शहाजी बापु पाटील,आ. दिलीप सोपल, हे त्यांचे खास स्नेही होते.
असा हा अवलिया आज माण तालुक्यामध्ये नाही मात्र त्यांचे कार्य माण तालुक्याच्या दुष्काळ हटवण्यासाठी अत्यंत मोलाचे काम आहे माण तालुक्यामध्ये यामुळे शिंगणापूर पंचक्रोशी ग्रामीण पाणीपुरवठा योजना म्हसवड शहराला पाणीपुरवठा करणारी इस्लामपूर म्हसवड पाणीपुरवठा योजना ही त्यापैकी होत. नगरविकास मंत्री रवींद्र माने यांना या योजनेसाठी प्रवृत त्यांनी केले.
अशा मोठ्या पाणीपुरवठा योजना सुरू केल्या आणि यामुळे माण तालुक्यातील काही भागांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला .
मात्र शेतीच्या पाण्यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला.
आणि संघर्षाच्या लढायांमध्ये त्यांचा  फार मोठा सहभाग होता .
माण तालुक्यातील दशरथ आबा जगताप, राजवडीचे भोसले, एम.के.भोसले, बाळासाहेब जगदाळे, दादा साहेब भोसले, भास्कर राव गुंडगे, नितीन दोशी, दतोपंत भागवत, संजय बडवे, बडवे सर , राजाराम बोराटे, कुकुडवाड येथील भाऊसाहेब काटकर ,शेणवडीचे अप्पा कदम,वरकुटे येथील बाळासाहेब जगताप, वावरहिरे येथील प्रमोदशेठ मुळे, दहिवडी येथील वाघोजीराव पोळ,डॉ. महादेव कापसे, गोरख शिर्के,शिवाजी राव वीरकर, हरिभाऊ निंबाळकर, बाबासाहेब हुलगे, अर्जुन काळे, जीवन कट्टे, गोविंदराव शिंदे, महादेव देवकर, काकासाहेब माने,
शामराव कोळेकर, बी.टी.जगताप, अर्जुन खाडे, धर्माजी खाडे,अरुण काटकर, इबुलाल तांबोळी, बडवे सर, शामराव झिमल, काळेल, बबन काळेल,
अशा माण तालुक्यातील अनेक  कार्यकर्त्यांना  आ. धोडीराम वाघमारे यांनी राजकारणात  सन्मान प्राप्त करून दिला होता. सर्वांना बरोबर घेऊन सामान्य जीवन जगणे हेच त्यांचे मोठेपण होते.
मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचं हे राहिलेले काम आता पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
आणि त्यांचे हे स्वप्न पाहण्याचा पूर्ण करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावं. आणि माण तालुक्यातल्या नेतृत्वांनी या माणदेशी शेतकऱ्याला पाण्याचे दान देऊन माणसा शेतकरी स्वावलंबी करावा हीच अपेक्षा त्यांची होती.
ही अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी त्यांचे सुपुत्र अभिजीत वाघमारे अत्यंत धाडसाने काम करत आहेत.
त्यांच्या या कार्याला माणवासियांच्या मनापासून शुभेच्छा आणि आमदार धोंडीराम वाघमारे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आता तरुणांनी एकसंघ चळवळ उभा करण्याची गरज आहे.
लेखन - विजय टाकणे.
पत्रकार, संपादक माणदेशी न्यूज.
9921494998.