पत्रकार अप्पासाहेब गुरव..एक बेरका माणदेशी पत्रकार,


माण तालुक्यातील चाणक्य,    बहुआयामी ,बेरका पत्रकार 



   स्व.अप्पा गुरव
माण तालुका हा दुष्काळी.
तालुका म्हणून ओळखला जातो.
पण या तालुक्यात जरी पाण्याचा दुष्काळ असला तरी बुद्धिवंतांच्या मात्र सुकाळ आहे .
या तालुक्यात बुद्धिवंत लोक खूपच जन्माला आले काही लोकांच्या लक्षात राहिले तर काही विसरून गेली.
पण या वेळेस मी  विस्मरणातील राहिलेल्या  लोकांना आता पुन्हा एकदा आपल्या आठवणीमध्ये ते जागृत करणार आहे.
खरंतर मी आज अशा , एका अष्टपैलू माणसाबद्दल सांगणार आहे.
त्यामध्ये अनेक गुण होते. 
आणि एक जबरदस्त व्यक्ती म्हणून या माणसाला लोक ओळखायचे !
माननीय क्रांतिवीर नाना पाटील, यशवंतराव चव्हाण., राम माळगी, अण्णा डांगे,माननीय शंकरराव मोहिते पाटील ,राजाराम बापू पाटील, बाळासाहेब भारदे , बुवासाहेब माने, महाराज, आ.केशवराव पाटील, आ.मोहनराव गुदगे, या लोकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून समाजसेवेचे काम करणारे एक तटस्थ वृत्तीचे तपस्वी  होत.
आप्पा 1953 साला त  पत्रकार झाले आणि त्याकाळी पत्रकारिता ही काय चीज असते हे त्यांनी लोकांना दाखवून दिले . च.प.भिशीकर, आचार्य अत्रे, शरद पळणीटकर. आ.कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या सोबत त्यांनी पत्रकार क्षेत्रात  काम केले.
महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या अगोदर 1953 सालात  प्रथम सातारा जिल्ह्यातून एक तरूण माण  तालुक्यातील   म्हसवड एक तरुण गावातून पत्रकार झाला. केसरी,मराठा, सकाळ, तरुण भारत या दैनिकाचे वार्ताहर म्हणून काम केले .
या माणसाचं नाव आहे. आप्पा गुरव'
हे आप्पा गुरव  म्हणजे एक फार मोठी  असामी .तसे पैशाने श्रीमंत नसावेत पण बुद्धिवान आणि बुद्धिवंत यामध्ये त्यांचा नंबर एक .
ज्याने आयुष्यामध्ये सतत अन्याया विरुद्ध लढा दिला आणि या लढ्यामुळे त्यांना गावातल्या गुरव समाजाने वाळीत पण टाकलेलं होतं. ते कधीच डगमगले नाहीत.
1924 साली  एका गरीब कुटुंबांमध्ये मसवड या सिद्धनाथाच्या नगरीत गुरव समाजाच्या पुजारी यांच्या घरात आप्पांचा जन्म झाला .
आप्पा लहान असतानाच त्यांची आई वारली .
आप्पाला एका माळी समाजातल्या महिलेने दूध पाजून मोठे केले .जणू त्यांचा पुनर्जन्म झालेला होता. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केलं मात्र आप्पा मोठे होईपर्यंत मानलेल्या आईच्या अंगाखांद्यावर खेळायचे आणि आयुष्यभर त्यांना विसरले नाहीत.
अधिकारी त्यांना मान देत.
खरंतर आप्पा कधी कोणापुढे झुकले नाहीत . आपल्या लेखणीच्या जोरावर भल्याभल्यांना त्यांनी आस्मान दाखवलं.
माघार कधीच  घ्यायचं नाही हा त्यांचा स्वभाव  होता.
सतत गोरगरीब आणि पिडीत असणाऱ्या लोकांसाठी आंदोलन उभे करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे .
आणि या लोकांच्या व्यथा वर्तमानपत्रांमधून मांडायच्या वेळप्रसंगी ्त्यांना त्याचा त्रास पण झाला .
त्यांच्यावर अनेक पोलीस केसेस झाल्या. त्यांना मारहाण झाली  पण या सगळ्यातून तावून सुलाखून ते बाहेर पडले.
कधी पाणीप्रश्‍नासाठी, कधी देवस्थानच्या जमिनीसाठी ,तर कधी देवस्थान च्या हक्कासाठी असा लढा सुरू असायचा .
लोकांना गरिबांना न्याय देणारा एक माणूस म्हणून ओळखायचे .
हा  रुबाबदार माणूस तीन बटन शर्ट अंगावर घालत.
डोक्याला टोपी आणि पांढरे शुभ्र धोतर धारदार नाक आणि तजेलदार चेहरा आणि तोंडात सतत पानाचा तोबरा असा हा मनुष्य बोलायला लागला की पुढच्या ची बोलती बंद करायचा.
वर्तमानपत्रात एखाद्या विरुद्ध बातमी लिहिले कि ती माणसं त्यांच्या कडे विनवणी करीत. यायची पण या माणसाने कधीच तडजोड केली नाही .
याचा त्यांना फटका बसला अनेक वेळा आर्थिक नुकसान झालं .पण कधी ते डगमगले नाहीत.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणी लढतच राहिले.
म्हसवडचा सिद्धनाथ मंदिरासाठी त्यांनी आणि गुरव समाजाला त्यांनी हक्क मिळवून दिला. म्हसवडचा देवस्थानचा ट्रस्ट निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
माण तालुक्यातल्या सहकार शेतकरी शेती हा उपक्रम त्यांनी पहिल्यांदा माण तालुक्यातल्या देवापुर गावांमध्ये राबविला.
को-ऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटी केली.
आणि गोरगरीबांना जमीन दिली.
कसेल त्याची जमीन आणि राहील राहील त्याचे घर हा त्याचा नारा.
पुढे आणीबाणीच्या काळात  हा कायदा इंदिरा गांधीनी काढला या काळामध्ये त्यांनी अनेक गरीबांना जमिनी मिळवून दिल्या.
सिलिंगच्या कायद्याचा फायदा ज्यांना जमिनी नाहीत अशा लोकांना मिळवून दिला. यामुळे मोठे शेतकरी व
अनेक जण त्यांच्यावर डाव धरून होते. मोठ्या शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल राग येत होता .
यामधून त्यांच्यावर केस पण झाल्या पण या केसला न डगमगता त्यांनी गरिबांना हक्क मिळवून दिला.
मान तालुक्यातला पाण्याचा लढा सुरुवातीला त्यांनी सुरू केला.
म्हसवड येथे विकास सेवा सोसायटीची स्थापना केली आणि गावाचा विरोध पत्करून आणि गरिबांना त्यांनी यात सामावून घेतलं . त्यांच्या विरोधात केस ही झाली.
सहकाराची चळवळ अधिक दृढ केली हे करत असताना माननीय शिवाजीराव देसाई, बाळासाहेब देसाई याचबरोबर राजाराम पाटील या लोकांनी त्यांना साथ दिली.
म्हसवड येथील माणिकचंद शेठजी दोशी, सुभाषकाका दोशी, आदिनाथ गाडे, रामभाऊ पैलवान,  नागु वीरकर, रामु लोहार, उद्धव सोनार, औदुंबर सोनार, श्याम सोनार, केसकर वकील, केसकर सर , बाळासाहेब माने, या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी म्हसवडमध्ये सिद्धनाथ पॅनल नावाची संघटना स्थापन केली.आणि नगरपालिका निवडणूक लढवली.
त्यांना 19 90 पर्यंत यश आलं नाही.
मात्र त्यांनी जिद्द कधी सोडलेच नाही  राजकारणात करण्यासाठी ते अत्यंत हुशार व चाणाक्ष होते . राजकारण कसे करायचे हे ते नेत्यांना नगरसेवकांना शिकवत.
अधिकारी वर्ग त्यांना दबकुण असत. पोलीस गाडीत बसून ते कधी फिरत, तर पोलीसाच्या विरोधात बातम्या ही देत.
लोकांना अन्यायातून बाहेर काढण्यासाठी आपल्या लेखणीचा त्यांनी वापर केला. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील दर्पण हा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला होता.  ते माण तालुक्यातील एक गरीबाचा आधारवड होते.
हे करत असताना त्यांनी गायनाचा आणि वादनाचा छंद जोपासला होता.
त्यांना उत्तम पेटी वाजवता येत होती. तबला वाजवत येत होता .आणि त्याच बरोबर गायन पण करत होते.
माण तालुक्यात कुठेही किर्तन भजन असेल तबल्याची साथ द्यायला बोलावत.  त्यांनी अनेकांना पेटी वाजवायला शिकविले.
याचबरोबर गायनाची उत्तम कला होती. अनेक कलावंत  भेटायला यायचे. सिद्धनाथ मंदिर पुजारी म्हणून लोक त्यांचा आदर करायचे पत्रकारितेच्या काळामध्ये हे भल्याभल्यांना त्यांनी लेखणीचा हिसका दाखवला आणि वयाच्या 87 व्या वर्षी सन  2010 आपला देह ठेवला.
असे हे बहुआयामी व्यक्ती आज हयात नाहीत पण त्यांच्या आठवणी मात्र कायम आहेत.
त्यांना दोन मुलं आहेत आणि हे यांचा वारसा पुढे चालवत आहेत.
असे हे आप्पा माण  तालुक्यातील एक बेरकी व्यक्तिमत्व होतं.
लेखन विजयभाई टाकणे. काका.
संपादक माणदेशी न्युज.
9921494998.