#किशोर सोनवणे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा सच्चा पाईक





किशोर सोनवणे. म्हसवड.

 
बालपण -
अतिशय सामान्य कुठुंबात किशोर सोनवणे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती.घरात बहिण ,भाऊ,आई वडील अशी माणसे. शेती नसल्याने पारंपरिक व्यवसाय करुन वडील संसाराचा गाडा कसाबसा हाकत होते. तीन बहिणी लग्नाला आलेल्या घरात खर्चाला लागणारे आवश्यक साधन सामग्री भरण्यात नाकी नऊ येत असत. अशात वडीलांना आजार आला अन् दुरदैवाने वडील गेले. सारा प्रपंचाचा भार लहान वयातच किशोर वर पडला. शाळेत जाण्याचं वय होतं. पण करणार काय?घरात कर्ता माणूस नसल्याने आई सोबत मिळेल ती मोल मजूरी करून दिवस कसातरी घालवायचा. सकाळी लवकर उठुन आईला कामात मदत करायची ,अन् शाळेत जायचं. शाळेची कपडे धुण्यासाठी शनिवारी दुपारच्या सुट्टी त ओढ्यावर जाऊन आईला कपडे धुण्यासाठी मदत करायची. यातच बालपण हरवून गेलेले. कुणी सणा सुदीला नवीन कपडे घातली तर आपणही असेच सुटा बुटात राहु एक दिवस असाही येईल अशी मनाला समजूत घालत ,हा स्वाभिमानी किशोर शाळेत मुठभर फुटाणे खिशात भरून पळत सुटायचा, मधल्या सुट्टीत पोरं जेवायला जात. तेव्हा झाडाच्या आडोशाला बसून हा बिचारा फुटाणे खाऊन पोटभर पाणी पिऊन साऱ्या समोर मोठी ढेकर देत असायचा. पण गरीबीच भांडवल कधीही केले नाही. चार मुलात आपली गरीबी कधीच उघडी केली नाही.
आई मात्र तिळ तीळ काळजी करत. माझं हे लेकरू शाळेत जातय पण पुढं कसं होणार, आईच काळीज तुटत होतं. पण ईलाज नव्हता. सगळ्या रोगावर औषध मिळत .पण गरीबीवर औषध नसतं. गरीबी मजा खुप वेगळी असते. ज्यानी चाखली त्यालाच माहीत. कधी कुणाच्या वाळलेल्या पाल्याला हात लाऊ नकोस. स्वाभिमानाने जग. भिक मागु नको.चोरी करु नको. हिच आईची शिकवण. समाजातील उनाड पोराच्या नदी लागून आपलं पोर बिघडलं. म्हणून माऊलीन काळजावर दगड ठेवून किशोर ला शाळेतन काढून सोलापूर ला नातेवाईकांकडे काम शिकायला पाठवले. एका कुशन मेकर च्या दुकानात ठेवलं. या दुकानात थोड्याच दिवसात काम शिकला हा मुलगा. त्याचं काम बघून च मालकान पगार वाढवला. आता जरा बरं होतं. पण म्हसवड हे मूळ गाव या गावात जाऊन आता दुकान सुरु करायचा. या उद्देशाने किशोर सोनवणे म्हसवड गावी परतला. कुशन मेकरचा व्यवसाय सुरु केला. पण जन्मजात संघर्ष करण्याची प्रवृत्ती असल्याने समाज सेवा सुरु केली, गोर गरीब नडलेल्या लोकांना न्याय मिळवून देणे हेच आपले काम आहे, असे समजून समाज सेवेचं व्रत हातात घेतले.
"हात खाली है पर बेपार करता हू। आदमी हू आदमीसे प्यार करता हु।"
असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरीत्र वाचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र वाचना नंतर किशोर सोनवणे यांचे जीवनच पार बदलून गेले. प्राण गेले तरी बेहत्तर पण माझ्या दलित व वंचित समाज ला मी न्याय मिळवून देणारच. यासाठीच माझा जन्म आहे. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी हा संघर्ष सुरु च ठेवणार अशी प्रतिज्ञा करुन नव्या उमेदीने किशोर कामाला लागला. दरम्यान आईला घरकामात मदत मिळावी यासाठी लग्व केले. लग्नानंतर अधिक नेटाने समाज सेवा सुरु केली. नळाला पाणी नाही, काढा मोर्चा, समाजातील लोकांना लाईट कनेक्शन मिळत नाही काढ मोर्चा, सतेतील लोकांनी अन्याय केला की कर आंदोलन, दुध दर करण्यासाठी, तर कधी शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी आंदोलने करणे, तर समाजातील आई बहिणीवर कुणी अन्याय केलाच तर शासकीय यंत्रणा व पोलीस यांच्या विरोधात धरणे,उपोषण,रस्ता रोको अशी आंदोलने करण्यासाठी आपला सगळा वेळ घालवत असत. यात व्यवसायाची घडी विस्कळित होत असत. समाज कार्य करणाऱ्या कार्यकरत्याच्या वेदना सामान्य माणसाला कधीच कळत नसतात. याच आंदोलनाच्या माध्यमातून किशोर तपासे या दलित नेत्याची भेट झाली. त्यामुळे सोनवणे याच जीवना नवी दिशा मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कळाण्यासाठी त्याचे पुस्तके वाचन किशोर सोनवणे यांनी याच काळात केले.आंबेडकरी चळवळ जवळ पाहणे.आणि प्रत्यक्षात ही चळवळ जगणे किती महत्वाचे असते. हे किशोर याला समजले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित व वंचित समाज जागृत केला. त्यांचा वारसा पुढे चालवणे हीच डॉ. बाबासाहेब यांना आदरांजली आहे. असे समजून ही चळवळ पुढे सुरु ठेवली. दरम्यान एका सामान्य सहकाऱ्याला त्रास दिल्या बद्दल पोलिसांनी खोट्या केस मध्ये अडकून मारहाणीची खोटी केस केली. यानंतर खरे संघर्ष पर्व सुरु झाले.
याच काळात समाजकल्याण मंत्री रामदासजी आठवले याची भेट झाली. त्या या धडाडीच्या कार्यकर्त्याला त्यांनी ओळखले आणि त्याला राजकीय ताकद दिली.
राजकीय प्रवास येथून सुरु झाला. यानंतर सातारा जिल्हा आरपीआय च्या उपजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्याचेवर देण्यात आली.आज अखेर एक संघर्ष शील कार्यकर्ता म्हणून ही जबाबदारी पेललेली आहे.
आरपीआय चे नेते अशोक गायकवाड, किशोर तपासे यांनी त्याला बळ दिले.
याच काळात म्हसवड नगरपालिका निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट झाली. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी किशोर सोनवणे यास मानस पत्र मानले.आजही हे नाते मनापासून जपले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन :- डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरीत होऊन जीवन जगताना समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन करणे क्रमप्राप्त ठरते. म्हसवड शहरात सुरु असणारा तृतीय पंथाच्या अंधश्रद्धा बाजार बंद केला. यासाठी खुप मोठा संघर्ष करावा लागला.
संकट: -संकटे नाहीत असा माणूस नसतो. प्रत्येकाला काहीतरी नवीन समस्या निर्माण होत असते. दरम्यान पत्नी आजारी पडली. यात च दोन वेळा मोठे अपघात झाले, पण दैव योगाने यातून कसेबसे सावरले. जीवनातील अनेक समस्यांना हसत तोंड देत असताना अने मित्र जोडले.
मित्र परिवार :- राजकारण, समाजकारण, सहकार या क्षेत्रात काम करत असताना नवे मित्र सोबत घेऊन काम करणे हे किशोर सोनवणे यांचे वैशिष्ट्य आहे. नेतृत्व कौशल्य जबरदस्त असल्याने सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणे. ही वृत्ती असल्याने किशोर याने जीवनात अनेक मित्र जोडले. आज अखेर ही मैत्री अभेद्य आहे.कधी कुणाला ही अडचण आली की मित्र पळत येतात. आपल्या परीने मदत करण्यासाठी आजही किशोर कधीच मागे पडत.नाही. गरीबा पासून ते करोडपती पर्यंत सगळ्याना हवा हवा वाटणारा असा दिलदार मित्र म्हणून याने लौकिक मिळवला. आहे. किशोर च्या या स्वभावाने किशोर हा अबाल वृध्दाचा किशोरभाऊ झाला आहे. वयोवृद्ध माणसे ही त्याला भाऊ म्हणून बोलवितात.
जात पात विरहित सगळ्या जाती धर्माचे लोक एकाच मैत्रीच्या धाग्यात बांधणारा किशोरभाऊ सोनवणे हा खऱ्या अर्थाने एक आंबेडकरी विचाराचा पाईक आहे.
अपूरे शिक्षण असून ही वाचणाची आवड असल्याने अनेक लेखक, व तत्वज्ञानी लोकांची विचारसरणी आत्मसात केलेला.बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी म्हणून वेगळा ठसा त्याने समाजात उमटविला आहे.केवळ मागासवर्गीय जातीत जन्माला आला म्हणून तो कुढत बसला नाही ,तर सर्वच उच्चभ्रू समाजातील लोकांच्या मनात आपला ठसा किशोरभाऊ सोनवणे यांनी उमठविलेला आहे.
लेखन.....
विजय टाकणे.
जेष्ठ पत्रकार.
संपादक माणदेशी न्यूज.
9921494998.