लेख...8)...
मच्छिंद्र चंदनशिवे.
शिक्षक.
शिक्षक.
स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्माणासाठी सक्षम भावी पिढी निर्माण करण्याचे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवून मोफत शालेय शिक्षणाची जबाबदारी प्रजासत्ताक भारताने स्विकारली .देशात लाखो सरकारी शाळा निघाल्या .करोडो मुला-मुलीना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळू लागले. मात्र अलीकडे भांडवलशाही आणि खाजगीकरणाने शिक्षण क्षेत्राला घेरले. अशावेळी सचोटीने , प्रामाणिकपणे ,जीवाचे रान करत अनेक गुरुजन आपली शिक्षकी सेवा बजावत आहेत. त्यातीलच एक माणदेशी नाव म्हणजे एम. डी. चंदनशिवे !
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगूनही आर्थिक अडचणीमुळे शिक्षकी पेशाकडे वळणारे चंदनशिवे यांनी शिक्षक म्हणून पाटण तालुक्यात सेवा बजावताना शिष्यवृत्ती , गुणवत्ता याबरोबरच धनगरवाडी व नवसूआवाड अश्या नवीन शाळा सुरु करण्यात पुढाकार घेतला . ‘उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी’ म्हणून पाटण तालुक्याने त्याना गौरविले. तालुका –जिल्हा-विभाग- राज्य स्तरावर अभ्यासू व तद्न्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
स्वतःच्या माण तालुक्यात आल्यानंतर अंधरवडवाडी येथे चार विध्यार्थ्याना ‘स्व.अभयसिंहराजे भोसले शिष्यवृत्ती’ सन्मान मिळवून दिलाच पण शाळेसमोरील मैदान, शैक्षणिक उठाव , नवीन शाळाखोली,दूरदर्शन संच, इत्यादी सोबतच ग्रामपंचायतीच्या मदतीने अडीच लाखाच्या दुहेरी पंप योजनेतून शाळेसमोर पाण्याची व्यवस्था केली.
पुढे पदवीधर शिक्षक म्हणून वरकुटे-मलवडी शाळेत रुजू होताच शाळेमागील परिसराचा कायापालट केला. सेमी- इंग्रजीसाठी जिल्हा परिषदेची परवानगी मिळवून आजतागायत शेकडो विध्यार्थ्याना वर्तमान स्पर्धेस सक्षम बनवत आहेत. नवोदय साठी विध्यार्थी निवड, क्रिकेट, पोवाडा स्पर्धेत जिल्हास्तरावर मजल, प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुकास्तरावर यश ,आनंद बाजाराचे अनोखे आयोजन, वार्षिक स्नेह संमेलनाचे उत्कृष्ठ आयोजन, ज्ञानरचनावादी व अध्ययन निष्पत्ती आधारित अध्यापन, यामुळे पालकांचा शिक्षक व शाळेवरील विश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे.
विशेष बाब म्हणजे एम. डी. चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’ पुणे येथे ‘अभ्यास मंडळ’ सदस्य म्हणून निवड झाल्यावर त्यांनी रामभाऊ म्हाळगी येथील पहिल्याच कार्यशाळेत शिक्षणमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपल्या सादरीकरणात पाठ्यपुस्तकाच्या सुरवातीला अध्ययन निष्पत्तीचा विचार ठामपणे मांडले. इयत्ता सहावी, सातवी,नववीच्या इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण व मोलाचे योगदान दिले आहे,हि बाब माणदेश व सातारा जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरली आहे.
शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही चंदनशिवे यांनी आपला समाजजीवनात ठसा उमटवला आहे. छ. शिवाजी महाराज, जिजाऊ मा साहेब, म.जोतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई, राजमाता अहिल्यामाई होळकर, आध्य क्रांतिकारक उमाजी नाईक म. बसवेश्वर, लोकशाहीर अण्णाभाऊ, संत गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अश्या महामानवांच्या जयंत्या- स्मृतिदिनाना प्रबोधनाचे स्वरूप देण्याचे काम ते मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. चंदनशिवे यांचा संविधानाचा गाढा अभ्यास असल्याने भारत निवडणूक आयोग, कम्युनिटी रेडीओ व माणदेशी तरंग वाहिनीने लोकशाहीचा महोत्सवांतर्गत त्यांच्या श्रोत्याना ऐकवलेल्या मुलाखती आजही स्मरणात आहेत.
श्री. चंदनशिवे यांची समर्पित भावनेने असलेली सातत्यपूर्ण प्रभावी अध्यापन शैली, विषयावरील प्रभुत्व, उत्कृष्ठ गायन कौशल्य ,माहिती- तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्तम वक्तृत्व, वार्षिक स्नेह संमेलनाचे उत्कृष्ठ आयोजन, आनंद बाजाराचा उपक्रम, विध्यार्थी –शाळेप्रती तळमळ, ग्रामस्थ-पालकांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे वरकुटे- मलवडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे उच्च प्राथमिकचे वर्ग दिमाखात टिकून आहेत. स्पर्धेच्या वातावरणात अनेक संकटे, आव्हाने पेलून उच्च प्राथमिकचे वर्ग टिकलेली माण तालुक्याच्या ग्रामीण भागातील हि एकमेव शाळा ठरली आहे. त्याचे श्रेय प्रतिकूल स्थितीत खंबीरपणे, सचोटीने शाळेचे अस्तित्व टिकवणाऱ्या आदर्श पदवीधर शिक्षक एम. डी. चंदनशिवे यांना जाते. विध्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणासाठी त्यांच्या कार्याला सदिच्छा......