मुंबई येथील कुर्ला बँकेच्या निवडणुकीत १७ पैकी ७ उमेदवार माण तालुक्यातील विजयी
मुंबईच्या कुर्ला बँकेच्या निवडणुकीत माणची बाजी
वरकुटे - मलवडी / वार्ताहर
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातील के एन एस (KNSB) तथा कुर्ला नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एकूण १७ जागेसाठी तीन पॅनल सह अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात होते. १७ पैकी ७ उमेदवार माण तालुक्यातील विजयी झाले आहेत. यामध्ये रयत पॅनलचे १७ पैकी १६ विजयी झाले आहेत या १६ मध्ये माण तालुक्यातील ६ जण विजयी झाले आहेत तर प्रगती पँनेलचे १७ पैकी१ उमेदवार विजयी झाला आहे. तो ही माण तालुक्यातील आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी मुंबई येथील कुर्ला नागरी सहकारी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत तीन पँनेल सह अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली होती . माण तालुक्यातील अनेकांनी अपक्ष व तीन ही पँनेल मधून नशीब अजमावले होते. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विजयी झालेल्या माण तालुक्यातील ७ विजयी उमेदवारांपैकी ६ उमेदवार हे धनगर समाजाचे आहेत. तर एक मराठा समाजाचा आहे. यामध्ये रयत पॅनल मधून भटक्या विमुक्त जाती या राखीव गटातून सर्वाधिक मतदान घेणारे व विद्यमान संचालक किसन भाई मदने ( बनगरवाडी ) हे तिसर्यांदा विजयी झाले आहेत. महिला राखीव गटातून विद्यमान संचालिका व माजी उपाध्यक्षा सौ. स्मिता विरकर ( विरकरवाडी ) ह्या तिसर्यांदा विजयी झाल्या आहेत. सर्व साधारण गटातून माण तालुका मार्केट कमिटीचे संचालक दादासाहेब पुकळे ( पुकळेवाडी ) हे पहिल्यांदा , गोविंद विरकर ( विरकरवाडी ) हे पहिल्यांदा , महेंद्र बनगर (बनगरवाडी ) हे दुसऱ्यांदा , राजेंद्र पोळ ( गोंदवले खु ) हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तर प्रगती. पॅनेलमधून एकमेव विजयी झालेले व एकदाही कुर्ला नागरी सह. बँकेची निवडणूक न हरलेले उमेदवार तथा माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विठ्ठल भाई विरकर यांचा समावेश आहे. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तूषार विरकर , बबन दादा विरकर , डॉ. प्रमोद गावडे , आप्पासाहेब पुकळे , पै. बाळासाहेब काळे , युवराज बनगर , दादासाहेब दोरगे , विजय बनगर , धनाजी विरकर , पै.दिपक रूपनवर , नगरसेवक सुरेश पुकळे , लुनेश विरकर आदींनी अभिनंदन केले त्याचबरोबर संपूर्ण माण तालूक्यातून अभिनंदन होत आहे.

