पाणी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धेत आटपाडी तालुक्यातील २० गावांना संधी
आटपाडी :( प्रतिनिधी )-
पाणी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धा व्हर्जन 2 मध्ये आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी,कानकात्रेवाडी, औटेवाडी,पिंपरीबुद्रुक,हिवतड, शेटफळे,पडळकरवाडी,जांभुळणी ,धावडवाडी,बाळेवाडी,पळसखेल,बोंबेवाडी,काळेवाडी,माडगूळे,देशमुखवाडी,राजेवाडी, उंबरगाव,मापटेमळा,आटपाडी,गुळेवाडी या 20 गावांची निवड झाली असून वॉटरकप सिझन 2,3,4या तीन वर्षातील कोणत्याही वर्षी किमान 100 पैकी 30 गुणांची कामे केलेल्या गावांचा समावेश आहे
यंदाही मुख्यमंत्री स्तरावरून स्पर्धेस सहकार्य होणार असून ही स्पर्धा दीड वर्षाची आहे 1 जानेवारी 2020 ते जून 2021 हा कालावधी असेल यामध्ये मृद व जलसंधारण,वृक्षसंवर्धन,संरक्षित कुरण विकासक्षेत्र पौष्टिक गवत लागवड, पीक अवशेषांपासून कंपोस्ट निर्मिती,जलव्यवस्थापन,सांस्कृतिक कार्यक्रम,जैवविविधता नोंदी,,लखपती किसान,शेती व पूरक व्यवसाय, भूमिहीनांसाठी उपजीविका,शेतकरी व गावकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे,शेती खर्चाच्या नोंदी ठेवणे,टँकरमुक्त गाव,स्वच्छ पेयजल,जलबचतीसाठी केलेले ठिबक ,आच्छादन,यांचा वापर सांडपाणी व्यवस्थापनमध्ये परसबाग,शोषखड्डे उपलब्ध पाणी व त्यानुसार गावाने वर्षभराचे खरीप रब्बी उन्हाळी केलेले पीक नियोजन व अंमलबजावणी ,शासनाच्या विविध योजनांतून पूर्वी गावात झालेली सर्व पाणलोट उपचार कामे,तसेच शासनाच्या सर्व योजनांची योग्य जोड देणारी गावे समृद्धीच्या मार्गावर असतील. स्पर्धेच्या टप्पा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक गावांना बक्षीस असेल तसेच राज्यस्तरावर 50, 30 , 20 लाख अशी 3 बक्षिसे असतील. जे गाव स्पर्धेतील गुणांकन पद्धतीने कार्ये करण्याचा प्रवास सुरु करेल ते गाव समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर असेल यामध्ये निसर्ग व माणूस दोघे समरस होऊन समृद्ध होतील लक्षत असू द्या जिथे निसर्ग प्रसन्न तेथेच बळिराजा संपन्न स्पर्धा पूर्ण करणारे प्रत्येक गाव केवळ आपल्या तालुक्यासच नव्हे तर देश आणि जगासाठी एक प्रकाशझोत बनू शकते तसेच गावातील शालेय मुलांची यामध्ये मदत घेता येईल त्याना निसर्गाची धम्माल शाळा उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशनकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे तसेच स्पर्धेच्या 4 दिवसीय निवासी नि शुल्क प्रशिक्षणास ग्रामसभेद्वारे प्रशिक्षणार्थी निवड झाली असून इच्छुक प्रशिक्षणार्थीनी पाणी फाउंडेशन तालुका समनव्यक सुहास पाटील 7499008245 यांचेकडे संपर्क करावा .
शालेय उपक्रमांत हिवतड,बाळेवाडी,करगणी, (लक्ष्मीनगर)जांभुळणी,पिंपरीबुद्रुक,राजेवाडी, शेटफळें, बोंबेवाडी या जिल्हा परिषद शाळा व माणगंगा हायस्कूल ,राजारामबापू हायस्कूल, गदिमा हायस्कूल,गुरुकुल,देशमुखवाडी, विभूतवाडी ,मातोश्री हायस्कूल,सिद्धनाथ विद्यालय,पंडित दीनदयाळ विद्यालय,इंद्रभाग्य प्राथमिक, पं. ज.नेहरू विद्यालय झरे, पं. ज. नेहरू हायस्कूल शेटफळे या शाळा समाविष्ट असून सर्व शाळात गावातून जण जागृती पर फेरी काढण्यात येत आहेत 6 दिवसीय 6 सत्राचे आयोजन पाणी फाउंडेशनतर्फे करण्यात आले असून 15 फेब्रुवारीपर्यंत हे उपक्रम संपतील . यामध्ये मानवाने निसर्गाचा केलेला ऱ्हास, पृथ्वी निर्मितीतील टप्पे ,परिसंस्था,पाणी,हवामान बदल,व समृद्ध गाव स्पर्धा याच्यावर करायची कृती या घटकांसह व्हिडिओ, खेळ,गाणी हे उपक्रम असतील. तालुक्यातील स्पर्धेस निवडलेल्या गावांना तहसीलदार सचिन लंगुटे साहेब, गटविकास अधिकारी मधूकर देशमुख साहेब,वनाधिकारी शिरगावे मॅडम,तालुका कृषी अधिकारी जीतकर साहेब व सर्व प्रशासकिय यंत्रणांचे सहकार्य लाभणार आहे.