म्हसवड रथमार्गावर खड्डे पडल्याने, अपघाताची शक्यता.

म्हसवड रथमार्गावर खड्डे पडल्याने, अपघाताची शक्यता.


म्हसवड: म्हसवड येथील रथ यात्र २७ रोजी होणार आहे. सुमारे ४ लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. रथासाठी २५ लाख रुपये खर्च करून रथ मार्ग शासनाच्या फंडातून केला आहे, मात्र संबंधित ठेकेदारांने या रस्त्यावर डांबरी करण न केल्याने हा रस्ता पुर्ण पणे उखडून गेला आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने रथाची वाट बिकट झाली आहे. सदर कंत्राटदार हा नगरसेवकाचा नातेवाईक असल्याने हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी संबधीत कंत्राटदार नकार देत असल्याचे सांगितले जात आहे. म्हसवड हे लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. या तीर्थक्षेत्र परिसरातील लोकांना त्रास होणार असुन रस्ता खराब झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत नागरीकांनी तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकारी सातारा यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. हा रथमार्ग तातडीने दुरुस्ती करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.