कागदी घोडे नाचवणे बंद करा,नुकसान भरपाई चे पंचनामे करा.
आ. जयकुमार गोरेंचे अधिकाऱ्यांना सुचना ; कृषीअधिकाऱ्यांची घेतली झाडझडती *
,म्हसवड : प्रतिनिधी ( फोटो )
माण आणि खटाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवायचे बंद करुन दोन्ही तालुक्यात सरसकट पंचनामे करावेत अशा सुचना आ. जयकुमार गोरे यांनी दिल्या. महत्वाच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी प्रांतांना दिल्या. दुचाकीवर तसेच चिखलातून चालत मार्ग काढत त्यांनी शेतीपिकांच्या नुकसानीची पहाणीही केली.
दहीवडीतील विह्रामगृहावर आयोजित बैठकीला प्रांत अश्विनी जिरंगे, तहसिलदार बाई माने, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माण आणि खटाव तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. जीवापाड परिश्रम करुन जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे.
कृषी आणि महसूल विभगाच्या अधिकाऱ्यांनी आता वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत.
पंचनामा करणाऱ्या तुमच्या एजन्सीज व्यवस्थित काम करणार नाहीत. त्यांचा मेळही बसणार नाही. सर्व ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश द्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि तहसिलदारांनी द्यावेत. या कामी दोन्ही अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालावे अशा सुचनाही आ. गोरे यांनी दिल्या.
आ. जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील दिवडसह विविध गावांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पाण्यात कुजलेली विविध पिके आणि फळबागांचे झालेले नुकसान अधिकाऱ्यांना दाखवून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.
चौकट .......
चिखलातून रस्ता काढत नुकसानीची पहाणी......
आ. जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन
