"आमच ठरलं" अन् बिघडल पण'! 'माणचे राजकारण तापलं'

"आमच ठरलं" अन्  बिघडल पण'!
'माणचे राजकारण तापलं'



म्हसवड दि. २ ( महेश कांबळे )

दोन दिवसांपुर्वीच आमच ठरलय म्हणत माण - खटावमधुन ठरलय च्या  टिमकडुन अनिल देसाई यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली खरी पण देसाई यांच्या उमेदवारीला माण व खटाव या दोन्ही तालुक्यातील देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी कडाडुन विरोध करत माणधील प्रभाकर देशमुख यांनी आमच ठरलय मधुन बाहेर पडुन राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणुक लढवावी असा आग्रह धरला आहे, तर खटावच्या रणजितसिंह देशमुख यांनीही या टिममधुन बाहेर पडुन अपक्ष निवडणुक लढवण्याचा केलेला निर्धार पाहुन आमच ठरल पण लगेच बिघडल असे म्हणल्यास ते वावगे ठरणार नसुन माणचे राजकारण मात्र आता अर्ज भरण्यापुर्वीच तापु लागल्याचे चित्र आहे.

आगामी होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीत माण - खटाव विधानसभा मतदार संघातुन गोरे बंधुना हद्दपार करण्यासाठी त्यांच्या सर्व राजकिय विरोधकांनी एकत्र येत माण - खटाव मधुन गोरे हटाव चा नारा देत आमच ठरलय म्हणत गोरे बंधुच्या विरोधात एकच उमेदवार सर्वानुमते देण्याचा निर्धार करुन माण खटाव चे राजकिय वातावरण गरम केले, मात्र गोरेंच्या विरोधात नेमका कोण उमेदवार द्यायचा हेच नक्की त्यांच्या विरोधकांचे ठरत नव्हते. अखेर दोन दिवसांपुर्वी आमच ठरलय मधुन अनिल देसाई यांचे नाव सर्वानुमते पत्रकार परिषद घेवुन जाहिर करण्यात आले, मात्र आपल्याला हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या शेकडो समर्थकांनी चलो लोधावडे ची हाक देत असंख्य कार्यकर्त्यांसमक्ष देशमुख यांच्या निवासस्थानी धडक देत तुमच ठरलय तर मग आमच पण ठरलय असे म्हणत देशमुख यांनीच उमेदवारी करण्याचा आग्रह धरल्याने आमच ठरल पण बिघडल पण असे चित्र सध्या या मतदार संघात पहावयास मिळत आहे.तर नेमका हाच धागा पकडत खटाव तालुक्यातील रणजीतसिंह देशमुख यांच्याही कार्यकर्त्यांनी चलो निमसोडची हाक देत रणजीतभाय्यांनी निवडणुक लढवावी असा घाट घातला आहे.
      गत १० वर्षापासुन माजी आ. जयकुमार गोरे हे या मतदार संघाचे नेतृत्व करीत असुन या मतदार संघात त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. सुरुवातीला ते अपक्ष म्हणुन या मतदार संघातुन निवडुन गेले त्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठींबा देत थेट कॉंग्रेस मध्ये प्रवेश करुन तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी याठिकाणी सिमेंट बंधार्याची मोठी साखळी निर्माण केली. मात्र ज्यावेळी तालुक्यात सिमेंट बंधार्याचा प्रोजेक्ट राबवण्यात आला त्यावेळी केंद्रात राष्ट्रवादीचे सुप्रीमो असलेले शरद पवार हे कृषी मंत्री होते तर प्रभाकर देशमुख हे राज्याचे सनदी अधिकारी होते माण - खटावमध्ये उभारण्यात आलेले सिमेंट बंधारे हे कृषी विभागाच्या मार्फत बनवण्यात आले असल्याने ते काम आ. गोरे यांनी केले नसुन पवार साहेबांच्या आदेशाने झाले असल्याचा व त्या कामाची संपुर्ण संकल्पना ही प्रभाकर देशमुख यांची असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजवर सांगत आले आहेत, तर मी येथील लोकप्रतिनिधी असल्याने ते बंधारे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच सहकार्याने झाले असल्याचे गोरे सांगत होते. गत झालेल्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली अन दोन्ही कॉग्रेस वेगवेगळ्या लढल्याने आ. गोरेंना पुन्हा याठिकाणी लोकांनी निवडुन दिले मात्र त्या निवडणुकीत त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले त्यांच्या विरोधात त्यांचे छोटे बंधु शेखर गोरे यांनीही त्यांना आव्हान देत त्यांच्या विरोधात दंड धोपाटल्याने गतवेळची लढाई ही दोन्ही गोरे बंधुतच झाली त्यामध्ये राजकारणात नवखे असलेल्या शेखर गोरे यांनी क्रमांक २ ची मते मिळवत आपली राजकिय सिध्दता दाखवुन दिली. तेव्हांपासुन दोन्ही गोरेंच्या मध्ये राजकिय द्वंद्व वाढले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गोरेंनी एकमेकाला शह देण्यासाठी भाजप व शिवसेनेत प्रवेश करुन तिकीटाचा दावा केला मात्र याच वेळी भाजप, शिवसेना, रासप, कॉग्रेस, राष्ट्रवादी, व रिपाई या सर्व पक्षातील त्यांच्या विरोधकांनी अबकी बार गोरे हटावचा नारा देत एकत्र येत आमच ठरलयचा सुर आळवत दोन्ही गोरेंची राजकिय हद्दपारी करण्याचा ठाम निर्धार केला. मात्र गोरेंच्या विरोधात एकत्र आलेल्या त्यांच्या सर्व विरोधकांच्यामधुन नक्की कोण उमेदवार उभा राहणार हे ना जनतेला ना त्या- त्या पक्षाच्या प्रमुखांना समजत नव्हते गत दोन महिन्यांपासुन आमच ठरलय असे म्हणत त्यांच्या अनेक बैठका झाल्या त्या बैठकांना राष्ट्रवादीसह इतर सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी हिरवा कंदील दाखवला, असे चित्र असताना सर्व विरोधकांना एकच धोबीपछाड देण्यासाठी व विरोधकांची कोंडी करण्यासाठी आ. गोरे यांनी गत महिन्यात थेट भाजपातच प्रवेश केला. तर त्यांचे कट्टर राजकिय विरोधक मानले जाणार्या शेखर गोरे यांनीही थेट शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्यामुळे आता आमच ठरलयच काय होणार अशी चर्चा संपुर्ण मतदार संघात सुरु झाली त्यावेळी आमच ठरलय मधील माजी आ. डॉ. दिलीप येळगांवकर,माजी आ. प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, डॉ. संदिप पोळ, सुरेंद्र गुदगे, मामुशेठ विरकर, बबनदादा विरकर, संदिप मांडवे या नेते मंडळींनी गोरे बंधुना आपला विरोध कायम असल्याचे सांगत आमच्यापैकीच एक उमेदवार या दोघांविरोधात रिंगणात राहणार असल्याचे वेळोवेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही त्यांच्यापैकी कोण एक याचा निर्णय ठरेना म्हटल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढु लागला अखेर दि. २७ सप्टेंबर रोजी आमच ठरलय मधुन प्रभाकर देशमुख यांचे नाव नक्की झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली अनेकांनी त्यांच्या उमेदवारी बद्दल त्यांचे अभिनंदन ही केले मात्र पुन्हा दि. ३० रोजी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमच ठरलय मधुन अनिल देसाई यांचे नाव उमेदवार म्हणुन जाहीर करण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या देशमुख यांच्या समर्थकांनी चलो लोधावडे चा नारा देत दि.१ ऑक्टोबर रोजी थेट देशमुख यांच्या निवासस्थानी धडक देत त्यांनी आपल ठरलय मधुन बाहेर पडत राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुक लढवण्याची गळ घालत आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत जोवर देशमुख उमेदवारी साठी होकार देत नाहीत तोवर त्यांच्या निवासस्थानातुन न उठण्याचा निर्धार केला. कार्यकर्त्यांच्या सर्व भावना व विचार ऐकल्यावर देशमुख यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला मात्र आता आम्ही ऐकणार नाही तुमच ठरलय तर आता आमच पण ठरलय म्हणत त्यांच्या निवासस्थानी देशमुख साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी संपुर्ण लोधवडे गाव दणाणुन सोडले. कार्यकर्त्यांचा उत्साह व आक्रमकता पाहुन देशमुख यांनी एक दिवसाची मुदत त्यांच्याकडे मागत आपल्या मनाप्रमाणे घडेल असा विश्वास तुर्ततरी दिला असला तरी जर देशमुख यांना उमेदवारी नसेल तर आपल ठरलय असे म्हणुन काय उपयोग होणार नाही असे ही त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निक्षुन सांगीतल्याने आमच ठरल पण बिघडल पण असे म्हणावे लागेल एवढे मात्र निश्चित.