‘ज्ञानदायिनी’ संस्थेतर्फे २३ ऑगस्टला 'आदर्श माता' व 'आदर्श शिक्षक' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
![]() |
| (विलास खरात) |
पुणे: ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने यंदाचा 'आदर्श माता पुरस्कार २०२६' आणि 'आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्कार २०२६' वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता एरंडवना येथील धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये (आबासाहेब गरवारे कॉलेजसमोर, कर्वे रोड, पुणे) पार पडणार आहे.
शिक्षणातील मोलाचे योगदान, समाजसेवा आणि भावी पिढीवर उत्कृष्ट संस्कार घडवणाऱ्या माता व शिक्षकांचा या व्यासपीठावरून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींची उपस्थिती या कार्यक्रमाला भारती बी.एससी. नर्सिंग कॉलेजच्या डॉ. भाग्यश्री मोगदेव, विप्रो लि. एसईझेडच्या वरिष्ठ अधिकृत अधिकारी ज्योती व्ही. साळवे आणि ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक विलास खरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच, नेहरू युवा केंद्राचे माजी डेप्युटी डायरेक्टर यशवंत माणखेडकर, प्रसिद्ध वक्त्या व एकपात्री कलाकार शुभांगी शिंदे फलटणकर आणि विख्यात संगीतकार व दिग्दर्शक हर्षित अमिराज हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास नागरिकांनी, शिक्षणप्रेमींनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.dnyandayini.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ७०२०२०३५०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेने कळवले आहे.

