मानवी जीवन मौल्यवान आहे,. अपघाता पासून दक्ष रहा ... रेणुका राठोड

 



 म्हसवड.....प्रतिनिधी 

 मानवी जीवन खूप मौल्यवान आहे. राष्ट्र शिस्तीने व संयमाने मोठे होत असून केवळ किरकोळ चुकीमुळे होणाऱ्या अपघाताबाबत दक्ष रहा असे आवाहन फलटण आरटीओ कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक रेणुका राठोड यांनी म्हसवड येथे केले.

           म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई   स्कूल म्हसवड व क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड चे विद्यार्थी सहभागी होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून फलटण आरटीओ कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक रेणुका राठोड यांचे सह मुख्याध्यापिका सुलोचना बाबर,  तसेच संजय जाधव, विजय महामुनी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

           यावेळी बोलताना रेणुका राठोड म्हणाल्या कोरोना महामारीत मयत झालेल्या लोकांपेक्षा आपल्या देशात अपघातातून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघात होण्याचे प्रमाण वयोगट 20 ते 40 दरम्यान जास्त आहे. अपघाताच्या माध्यमातून वाईट घटना घडूच नाही म्हणून काळजी घ्या. वाहन चालवताना बेफिकिरी, वेग मर्यादा तसेच सुरक्षिततेची काळजी घ्या. परमेश्वराने दिलेले जीवन पुन्हा नाही याचे भान बाळगण्याचे आवाहन  राठोड यांनी केले .

       पुढे बोलताना रेणुका राठोड म्हणाल्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी दोन चाकी वर असाल तर  हेल्मेट वापरा., चार चाकी मध्ये बसल्यानंतर सीट  बेल्टचा  वापर करा.. यावेळी वाहतुकीचे नियम, रस्ता वळण प्रवास, वाहतूक चिन्हाची लिपी, रस्त्यावरील दिशादर्शक चिन्हे, सिग्नल वाहतूक सुरक्षा , रस्त्यावरील  काळजीवाहक चिन्ह, रेडियम चे प्रकार , रस्त्यावरून चालताना घ्यावयाची काळजी व चालण्याची योग्य बाजू,  इंडिकेटर चा वापर , दोन वाहनांमधील अंतरा साठी घ्यावयाची काळजी , ट्राफिक व्यवस्थेचे इशारे, अपघात झाल्यानंतर घ्यावयाची काळजी व सामाजिक बांधिलकी तसेच प्रवासामधील बेफिकिरी व वाहनाची वेग मर्यादा , तसेच अपघाताची कारणे इत्यादी बाबत त्यांनी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तसेच रस्ते सुरक्षा बाबत प्रबोधन केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील उपक्रमशीलतेबद्दल   त्यांनी  गौरव उदगार  काढले.

        प्रास्ताविक संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक अभिजीत सावंत यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे  आभार मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी व्यक्त केले.