कलेढोण: ता. खटाव येथील ग्रामपंचायत येथे स्व. अजित दादा यांची जयंती संपन्न झाली.या जयंतीनिमित्त कलेढोण गावचे सरपंच प्रशासक अरुण बुधावले, ग्रा. सदस्य अशोक आतकरी, वैशाली पवार आदी मान्यवर उपस्थितीत होते. या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ सावंत यांनी दादांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच पत्रकार दिपक नामदे यांनी देखील अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कलेढोण येथील ग्राम महसूल अधिकारी वाय. के. परदेशी, प्राथमिक आरोग्य विभागाच्या अधिपरिचारिका निलोफर नदाफ, प्रशांत शिंदे, राजन लिगाडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.