मायणी येथे मुनी महाराज मठात गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम


  मायणी प्रतिनिधी---

--सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गुरु औंधकर महाराज मठ शाखा मायणी येथे 29 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त मठातील मुनी महाराज संजीवन समाधीस रुद्राभिषेक, शिव भजन, महा मंगल आरती, व महाप्रसाद आशा स्वरूपाची दिनचर्या आहे यावर्षी शिवभजनासोबत शिवभक्त परायण परशुराम डोंबे यांचे शिवकिर्तन संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे पूजन व इत्यादी कार्यक्रम जोगेंद्र स्वामी व योगेश स्वामी करणार आहेत तसेच मायणी, विटा, माऊली, येतगाव, या पंचक्रोशीतील शिष्य गण व भक्तगण उपस्थित राहणार आहेत सदर गुरुपौर्णिमेस सर्व शिष्य व भक्तांनी उपस्थित राहून गुरुकृपेषपात्र व्हावे असे आवाहन औंकर मठातील शार्दुल स्वामी निम्बर्गीकर यांनी केले आहे