शासनाची सर्व ओळख पत्रे भारतीय नागरिकांत्वाचा पुरावा मानावा : प्रा नागनाथ स्वामी.

 


शासनाची सर्व ओळख पत्रे भारतीय नागरिकांत्वाचा पुरावा मानावा : प्रा नागनाथ स्वामी.  

     वडूज , दि ( ११) :  भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली पण अजूनही या देशात भारतीय नागरिकत्वाचे बाबतीत निश्चित पुरावा कोणता ? याबाबत संभ्रम आहे, त्यामुळे इतकी अधिकृत ओळख पत्रे असूनही भारतीय नागरिकत्व सिद्ध होत नाही. तेव्हा भारत सरकारने त्यांनी दिलेली सर्व अधिकृत ओळख पत्रे व परवाने हा भारतीय नागरिकात्वाचा कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरावा अशी मागणी जागृत ग्राहक राजा चे राज्य सचिव, प्रा नागनाथ स्वामी यांनी केली आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी -- भारतात शासनाने भारतीय नागरिकांना आधार कार्ड , पॅन कार्ड, मतदार ओळख पत्र, पास पोर्ट, वाहन परवाना अशी अनेक ओळख पत्रे कागद पत्रांची तपासणी करून शासनाच्या अधिकृत कार्यालये व यंत्रणा मार्फत नागरिकांना दिलेली असतात. पण यातील कोणतेही ओळख पत्र हा भारतीय नागरिकांत्वाचा पुरावा मानला जात नाही.याचा अर्थ शासनाचाच शासनाने दिलेल्या ओळख पत्रावर  विश्वास नाही, असे सिद्ध होते. त्यामुळे भारतीय नागरिकत्व सिद्ध करताना " डोमेसाईल सर्टिफिकेट " हे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून द्यावे लागते. हे सर्टिफिकेट काढताना जन्म दाखल्या सह अनेक कागद पत्रे जोडावी लागतात. शिवाय हे प्रमाण पत्र मिळवताना नागरिकांना सेतू कार्यालयासह अनेकांचा त्रास सहन करावा लागतो, आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागतो. या शिवाय ही सर्व ओळख पत्रे व सर्टीफिकेट्स सांभाळताना ज्येष्ठांसह सामान्य नागरिकांनाही कमालीची कसरत करावी लागते. तेव्हा शासनाने या बाबींचा व नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा संवेदनशील पणे विचार करून शासनाने दिलेली आधार, पॅन, मतदार ओळख पत्रे व वाहन चालक परवान्यासह ज्यावर फोटो आहेत, अशी सर्व ओळख पत्रे व परवाने भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा किंवा असे एकच कॉमन ओळख पत्र द्यावे, की ते सर्व ठिकाणी चालेल. ते देण्याची व्यवस्था करावी.

      तरी शासनाने तातडीने या संबंधी निर्णय घेऊन भारतीय नागरिकांची सोय करावी,अशी मागणी प्रा नागनाथ स्वामी यांनी केली आहे. 

चौकट - ( याबाबत माढा लोकसभा मतदार संघांचे खासदार मा धैर्यशील मोहिते पाटील यांचेशी संपर्क झाला असून हा विषय तातडीने केंद्र सरकार समोर मांडून त्वरित निर्णय होऊन एकच ओळख पत्र मिळेल यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल असे सांगितले आहे.)