जिल्ह्यात वर्षावास कार्यक्रमास मोठ्या उत्साहात प्रारंभ !

सातारा : जिल्ह्यात विविध धार्मिक संघटनेच्यावतीने वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखात प्रारंभ झाला आहे.

      करंजेपेठ येथील सुखदेव घोडके यांच्या परिवाराच्यावतीने वर्षावास कार्यक्रमात बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन  शहाजी वाघमारे यांनी केले. त्यावर भाष्य जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव यशपाल बनसोडे, विश्वास सावंत,मारुती भोसले आदींनी केले.सदरच्या कार्यक्रमास सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव बनसोडे,मंगेश डावरे, गणेश कारंडे,प्रकाश सावंत, रमेश जाधव,सीताराम गायकवाड,प्रांजाली घोडके, वसंत गंगावणे,दिलीप कांबळे, बाळासाहेब सावंत,अशोक भोसले,व्ही.बबन दाम्पत्य, आत्माराम घोडके,अंकुश धाइंजे,चंद्रकांत म्हस्के,अनिल वीर आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी,सोनाली भोसले, भारती गायकवाड,सोनाली भोसले,ऐश्वर्या गायकवाड, प्रथमेश खरात,सुनील कांबळे, वैशाली घोडके,पायल घोडके, प्रणव घोडके,पांडुरंग घोडके, सुजाता घोडके,पांडुरंग घोडके,संपूर्ण घोडके परिवार, कार्यकर्ते,उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम पार पाडला.तुषार घोडके यांनी आभार मानले.शेवटी खिरसह स्नेहभोजनांनी सांगता करण्यात आली.

             बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरुपौर्णिमा आणि वर्षावास आरंभ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेनंतरची ही अत्यंत पवित्र पौर्णिमा मानली जाते.गौतम बुद्धांनी वयाच्या २९ व्या वर्षी संसाराचा त्याग करून गृहत्यग केला.तो दिवसही आषाढ पौर्णिमेचा होता.पहिली धम्मदेशना बुद्धत्त्व प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी सारनाथ येथील मृगदावात आपल्या पहिल्या पाच शिष्यांना पहिली धम्मदेशना दिली. या ऐतिहासिक घटनेमुळे या दिवसाला 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणतात.बुद्धांनी शिष्यांना पहिले ज्ञान दिल्याने या दिवसाला बौद्ध धम्मात गुरुपौर्णिमा म्हणूनही वंदले जाते, जिथे बुद्ध हे जगाचे मूळ गुरु मानले जातात.आषाढ पौर्णिमेपासून पुढील तीन महिने आश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्षू संघाने एकाच ठिकाणी राहून साधना व अध्ययन करण्याचा काळ म्हणजेच 'वर्षावास' या दिवशी सुरू होतो.अशाच आशयाचे व्याख्यान ठिकठिकाणी झाले.


फोटो : महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.