सामाजिक कार्यकर्ते आबा शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, म्हसवड पोलीसात तक्रार दाखल.

 सामाजिक कार्यकर्ते आबा शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, म्हसवड पोलीसात तक्रार दाखल.





म्हसवड वृत्तसेवा...

खडकी तालुका मान येथील आबासाहेब नारायण शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन घर उध्वस्त केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे .याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल केलेली आहे याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .

याबाबतची अधिक माहिती. अशी, आबासाहेब नारायण शिंदे यांचे स्वतःच्या मालकीचे साडेतीन गुंठे क्षेत्र खडकी हद्दीमध्ये आहे. मात्र या हद्दीमध्ये असणाऱ्या क्षेत्रात बांधलेले वास्तव्यास असणारे पत्र्याचे शेड व  गोटा हा दादा दाजीराम  खांडेकर व्यक्तीने तोडफोड करून मोडला असून आबासाहेब नारायण शिंदे यांना जेव्हा मारण्याची धमकी दिलेली आहे . तसेच त्याची पत्नी दिपाली शिंदे हिला धक्का बुक्का केली आहे.

सदर जागे संदर्भात न्यायालयात दावा दाखल असून या परिसरातील काही लोक नाहक त्रास देत असल्याचे सांगितले आहे.

असे या तक्रारीत त्यांनी म्हटलेले आहे याबाबत सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले असून आबासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्यात येत असून त्यांना वारंवार गावकऱ्यांकडून व येथील काही समाजकंटक लोकांकडून त्रास देण्यात येत आहे असे त्यांनी या वेळेला माण देशी न्यूज ला बोलताना सांगितले आहे.