सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये नियमित पाण्याविना हॅट्रिक..

 

             (अजित जगताप) सातारा...



दि: 31 जुलै..

लोकप्रतिनिधी व राजकीय व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी मायेची ऊब देणारे सातारा येथील शासकीय कार्यालय म्हणजे खऱ्या अर्थाने सब भूमी गोपाळची असेच असते. पण, ऐन पावसाळ्यात चक्क तीन दिवस पाणीपुरवठा करणारी पाईप फुटल्याने सातारा येथील शासकीय विश्रामगृह नियमित येणाऱ्या पाण्याविना हॅट्रिक साजरी केली आहे.                                 याबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. अशा वेळेला अचानक सदर बाजार परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप फुटल्याने काही भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या पाईपची दुरुस्ती पावसामुळे संथ गतीने होत आहे. त्यामुळे काहींना जीवन प्राधिकरण्याच्या पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात असणाऱ्या बोअरवेल यंत्रणेमुळे नवीन शासकीय  व जुन्या शासकीय विश्रामगृहातील पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात आल्या. तसेच अभ्यागतांची वर्दळ कमी असल्यामुळे फारसा नियमित पाणीपुरवठ्याबाबत त्याचा त्रास जाणवला नाही.  शासकीय विश्रामगृहाची स्वच्छता होत आहे. सध्या महायुतीचे सरकार असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील चार मंत्री व चार आमदार आणि त्यांचे समर्थक यांची खूप मोठी गर्दी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी असते. तसेच अंगरक्षक व पायलटचे काम करणारे ही कर्मचारी या ठिकाणी थांबतात. या पाणीपुरवठा पाईप फुटल्यामुळे त्याची अद्यापही झळ बसली नाही. तरीही भविष्यात याबाबत विचार विनिमय करून शासकीय विश्रामगृहातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.                            


   .... फोटो सातारा शासकीय विश्रामगृहातील नवी व जुनी इमारत (छाया -अजित जगताप, सातारा)