म्हसवड.. प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा यांची जयंती क्रांतिवीर शैक्षणिक संकुल मसवड येथे नुकतीच संपन्न झाली.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय, नूतन मराठी शाळा तसेच क्रांतिवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्वर्गीयअजित दादांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांचे हस्ते करण्यात आले. या निमित्ताने विश्वंभर बाबर यांनी स्वर्गीय अजितदादांच्या अष्टपैलू कार्याची माहिती उपस्थित त्यांना दिली. तसेच तात्कालीन वेळी समक्ष भेटी अंती झालेल्या चर्चेनिमित्त केलेल्या कामाची उजळणी या निमित्ताने उपस्थितांना सांगितली. यावेळी संकुलातील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...
