सम्राट अशोक यांनी आपल्या मुलांकरवी धम्मप्रचार केल्याने ते धम्माचे पालक झाले !

 

(सरपंच जयश्री मोरे यांना पुस्तक देताना तुकाराम गायकवाड शेजारी मान्यवर)


सातारा : सम्राट अशोक यांनी ८४ हजार विहार अथवा स्तूप बांधले म्हणून त्यांना धम्म पालकत्व मिळाले नाही.तर त्यांनी कलिंगा युद्धानंतर बुद्ध धर्म स्वीकारला.शिवाय,त्यांनी आपली महेंद्र आणि संघमित्रा  यांना परदेशात धम्म प्रचार-प्रसार करण्यास पाठविले होते.म्हणून ते खऱ्या अर्थाने धम्माचे पालक झाले.असे प्रतिपादन थेरो दिंपकर (भन्ते) यांनी केले.

             भीमज्योत बंधुत्व संघ, विश्वरत्न कला मंच व सरपंच जयश्री संतोष मोरे (दाम्पत्य) यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्रेय बुद्धविहार,नूने येथे गर्भ संस्कार मंगल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा भन्ते धम्मदेसना देत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे हिशेब तपासणीस नंदकुमार काळे होते.यावेळी बंधुत्व संस्थापक अनिल वीर,ऍड. विलास वहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

               थेरो दिंपकर म्हणाले, "पारंपारीकतेला छेद देऊन वैज्ञानिक विचार सरणी रुजली पाहिजे.आई विचार व अन्न जसे गृहण करीत असते.ते गर्भात असणाऱ्या बाळास मिळत असते.अर्थात,पालन-पोषणही तशाच प्रकारचे होत असते.मानवाचे आनंदाने वागणे-बोलणे असेल तर सुख प्राप्त होत असते.बुद्ध विचाराने अंधकार नष्ट होत असतो.बुद्ध धम्मात मैत्री आहे.त्यामुळे तो सनातन धम्म आहे.रागामुळे भीक मागण्याची वेळ येईल.तेव्हा रागाची हत्त्या केली तर सुख येईल.मानवाने संयमाने राहिले पाहिजे.जिल्ह्यात भिक्कु वाढले पाहिजेत.त्यासाठी धम्म प्रचारकांनी प्रयत्न केला पाहिजे."

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड यांनी आपल्या मनोगतासह,गर्भ आईच्या पोटातला दिन  दलितांसाठी वाढवा...हे गीत सादर केले.शिवाय,त्यानी प्रा.राम बिवलकर व प्रा.झुंबरलाल कांबळे लिखित,"महाडचा मुक्तीसंग्राम" हे पुस्तक सरपंच जयश्री मोरे यांना भेट दिली.

     समाजभूषण नंदकुमार काळे म्हणाले,"गर्भाची वाढ होण्यासाठी ग्रहणवैगरे या भ्रामक कल्पना पाळु नये.जुन्या चालीरीती सोडल्या पाहिजेत. त्यासाठी धम्म संस्कार आत्मसात केला पाहिजे." दिलीप कांबळे म्हणाले, "महिलांची प्रगती झाली की आपसुकच समाज प्रगतिपथावर जाईल.म्हणूनच प्रथमतः महिलांचे प्रबोधन झाले पाहिजे." यावेळी अनेक उपासक व उपासिका यांनी सरपंच जयश्री मोरे यांना वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली.

    प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अनिल वीर यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली.संपूर्ण विधी भन्ते यांच्या अधिपत्याखाली नन्दकुमार काळे यांनी पार पाडला.संतोष मोरे यांनी आभार मानले.शेवटी चुलीवरच्या पुरणपोळीचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. यावेळी पीएसआय महेंद्र मोरे,श्रीकांत मोरे,महादेव मोरे,वर्षा मोरे,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


.