सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक समता परिषदेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका याची प्रत प्रत्येक कुटुंबास वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले.भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार समाजकल्याण सहआयुक्त सुनील जाधव,विशेषाधिकारी श्रुती रकटे, पदाधिकारी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गणेश भिसे व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी अर्पण करून अभिवादन केले.यावेळी आमंत्रित प्रमुख पाहुणे उपस्थित होते.प्रामुख्याने जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे जीवन गलांडे,उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सामाजिक समता कार्यक्रमनिमित्त कार्यक्रमांची माहिती दिली.यावेळी सर्व अधिकारी,पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.समतादूत विशाल कांबळे यांनी आभार मानले.
फोटो : डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.
