आय.पी.एस. निखील पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती

 



सातारा, दि. २० 

सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा उपयोग राजकीय दृष्ट्या केल्याचा आरोप असलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 सातारा जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर भाजप व सातारा पोलीस युतीबाबत उघडपणाने नाराजी व्यक्त केली जात होती. साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती.

अपहरणाचा गुन्हा व जिल्हा परिषद सदस्यांना धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा उन्हाळी हंगामातील महाराष्ट्र विधानमंडळातही गाजला.  आदरणीय श्री दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर श्री दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते. परंतु या संदर्भातील पोलीस अधिकारी श्री म्हेत्रे व गर्जे यांच्यावरील कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याबाबतही शिवसेना उपनेते व सातारा जिल्हा पालकमंत्री आक्रमक होणार आहेत असे समजते.

         सातारा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्री पिंगळे यांच्यासमोर सातारा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांचे उद्दातीकरण व परप्रांतीय वाढत्या नागरीकरण आणि कायदा व सुव्यवस्था अशा अनेक प्रश्नांच्या बाबत काही दिवसांसाठी त्यांना अभ्यास करावा लागणार आहे. कारण बऱ्याच गोष्टी या विलंबाने उघड होत असल्याने गुन्हेगार सुटत आहे अशी चर्चा होत आहे. 

______


RIDDHI SIDDHI SANSTHA


🌼 रिद्धी सिद्धी संस्था, म्हसवड 🌼


पुढील प्रमाणे कर्मचारी पाहिजेत:


🔹 समन्वयक (Coordinator)

🔹 दस्तऐवजीकरण (Documentation)

🔹 सहाय्यक समन्वयक (Assistant Coordinator)

🔹 फिल्ड ऑफिसर (Field Officer)


📍 कार्यस्थळ: म्हसवड


💰 मानधन: ₹10,000 ते ₹20,000


🎯 पात्रता:

✔️ समाजकार्याची आवड असणे अत्यंत आवश्यक

✔️ अनुभव असल्यास प्राधान्य

✔️ विना अनुभवी चालतील

✔️ दस्तऐवजीकरणासाठी संगणक आवश्यक


⚠️ अर्जंट पदे भरणे आहेत


📞 संपर्क: 9921652905

__________________________________


फोटो-- सातारा जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्री पिंगळे