शिवाजी महाराजांची जयंती माधवराव पाटील महाविद्यालय उत्साहात साजरी...


 


(मुरुम प्रतिनिधी) 

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी  जयंती श्री माधवराव पाटील महाविद्यालयात  गुरुवारी (ता.१९) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले, शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल काळामध्ये दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून अनेक गड-किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये स्वकीय व परकीय यांच्याबरोबर लढा उभारत रयतेचा राज्यकारभार, कुशल प्रशासन, सर्वधर्मसमभाव, स्त्रियांचा सन्मान राखत सुराज्य निर्माण केले. प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. नरसिंग कदम, डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. अरुण बावा, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. रमेश आडे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, प्रा. अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. राजू ढगे, सुरेखा पाटील, दत्तू गडवे, नितीन कंटेकुरे, लालअहमद जेवळे, चंद्रकांत पुजारी, दिलीप घाटे, इसाली चाऊस, व्यंकट मंडले आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. किरण राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्येने विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचारी उपस्थित होते.                                             

 फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात शिवजयंती प्रसंगी डॉ. चंद्रकांत बिराजदार प्राध्यापक, कर्मचारी वृंद.