येथे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची संयुक्त जयंती सातारा जिल्हा काँग्रेस कार्यालयात साजरी

सातारा वार्ताहर 
महात्मा गांधी जयंती सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सातारा येथे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व दिवंगत पंतप्रधान, ‘भारतरत्न’ लाल बहादुर शास्त्री जी यांना जयंतीनिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख (भैय्या) यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कार्यालयात विनम्र अभिवादन केले.

यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अमरजित कांबळे, प्रदेश महिला सरचिटणीस मनीषा पाटिल,माण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ महेश गुरव, माण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबासाहेब माने ,जेष्ठ विधीतज्ञ शंकरराव निकम,तसेच इतर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.