गोंदवले खुर्द ता. माण येथील माणगंगा नदीवरील पुलावरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुचाकी पाण्यात वाहून गेली सुदैवाने दुचाकीवरील बचावले


गोंदवले - गोंदवले खुर्द वरुन राणंदला जाणाऱ्या 

पुलावरून एक दुचाकी वाहून गेली दुचाकी वरील तीन जणांना वाचवण्यात यश दुचाकी वर असणारे तिन्ही लोक राजस्थान मधील असून ते राणद मध्ये राहत होते फरशी बसण्याच काम करत होते आज सकाळी नियमितपणे आपल्या कामासाठी ते लोधवडे परिसरात गेले होते काम संपून परत जाण्यासाठी गोंदवले खुर्द मध्ये आले त्यावेळी गोंदवले खुर्द च्या पुलावरून पाणी प्रचंड प्रमाणात वाहत होते लोकांनी त्यांना गाडी पाण्यात घालू नका म्हणून सांगितलं असताना सुद्धा त्यांनी पाण्यातून गाडी नेण्याचा प्रयत्न केला मात्र पुलाच्या मध्यावर गेल्यावर पाण्याच्या वेगाने त्यांची दुचाकी घसरली अन थेट पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली हे पाहताच काही मुलांनी त्या तिघांना पाण्यातून बाहेर काढले मात्र त्या पाण्यात दुचाकी वाहून गेली.
माणगंगा नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी यापूर्वीच ग्रामस्थांनी केली आहे कारण माध्यमिक विद्यालय देखील नदी पात्राच्या पलीकडे आहे तसेच सदर राणंद ते  गोंदवले खुर्द रस्त्याचे काम ही सुरु आहे त्यामध्ये नविन पुलाची उंची देखील वाढणार आहे त्यामुळे सदर काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी केली जात आहे.