गोंदवले. - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे वतीने सन 2023 मध्ये
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सातारा जिल्हयात
इयत्ता ११ वी १२ वी इंग्रजी विषय गटात प्रा पंकज बोबडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
प्रा. बोबडे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे कार्यरत असून ते एच एस बोर्ड परीक्षेचे इंग्रजी विषयाचे माॅडरेटर म्हणून सुद्धा काम करतात. याशिवाय इ १२ वी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी इतर विद्यालयात जातात. ते सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष म्हणून काम करतात याशिवाय श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित फलटणचे चेअरमन सुद्धा आहेत.
त्यांना मिळालेल्या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सुर्यवंशी बेडके, संस्थेचे मानद सचिव डॉ श्री सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके, नियामक मंडळाचे सदस्य श्री महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके, नियामक मंडळाच्या सदस्या सौ ज्योतीताई सचिन सुर्यवंशी बेडके, विद्यालयाच्या प्राचार्या सौ सुरवसे मॅडम, माजी प्राचार्या रायते मॅडम, पर्यवेक्षिका सौ गायकवाड मॅडम, विद्यालयाचा शिक्षक शिक्षकेत्तर स्टाफ यांनी अभिनंदन केले.
छाया - प्रा.पंकज बोबडे यांचा सन्मान करताना मान्यवर