दहिवडी ता.माण जि.सातारा येथे आज अंदाजे 3.57 कोटी रुपयांच्या नगरपंचायतीच्या विविध कामांचा शुभारंभ आ.जयकुमार गोरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष धनाजी जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.....या मध्ये गोसावी मळा ते आंधळी पुनर्वसन रस्ता काँक्रेटिकरण, राॕकेल पंप ते आदर्श शाळा रस्ता काँक्रेटिकरण ,गांधी नगर व चावडी चौक येथील बंधिस्त गटार तसेच घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचराडेपो येथे संरक्षक भिंत व सपाटीकरण करणे ,गोंदवले रस्ता येथील बंधिस्त गटार या कामांचा समावेश आहे....
