______________________________________
आटपाडी दि १ . ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते, पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाचे नेते आटपाडीचे आनंदरावबापू पाटील यांचा ६२ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर - आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर यांच्या हस्ते आणि पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील , राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक , राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत भोसले, दुसरे उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, तालुका सरचिटणीस विजय पुजारी, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत इत्यादींच्या उपस्थितीत फेटा,शाल ,हार पुष्पगुच्छ देवून आनंदरावबापूं पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
आटपाडी तालुक्यासह माणदेशाचा आर्थिक स्तर सुधारण्यास कारणीभूत ठरलेल्या डाळींब क्रांती आणि शेत तळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि ना . जयंतराव पाटील साहेब यांची विचारप्रणाली आणि ध्येय धोरणे राबविण्याचे काम अखंड पणे आनंदराव बापू पाटील यांनी केले असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजयराव पुजारी यांनी दुष्काळी तालुक्यामध्ये कृष्णेचे पाणी यावे यासाठी तसेच देशात पथदर्शक ठरलेल्या आटपाडी तालुक्यातील बंदिस्त पाईपलाईन संबधी आनंदराव बापू पाटील यांनी क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी, डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वा खाली मोठे काम केले आहे . प्रारंभी खडतर आयुष्य जगलेल्या आनंदराव बापू पाटील यांनी दुष्काळी जनतेसाठी ताकदीने लढता यावे म्हणून नोकरीवर पाणी सोडून दुष्काळग्रस्तासाठी केलेले काम राज्यात दखल घेण्यासारखे आहे . आई तुळजाभवानी श्री . सिध्दनाथांनी आनंदराव बापू पाटील यांना उदंड आयुष्य ,उत्तम आरोग्य ,चौमुलकी डंका वाजणारी दैदिप्यमान किर्ती द्यावी,अशा भावना स्वागत प्रास्तावीक करताना विजयराव पुजारींनी व्यक्त केल्या .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्या पासून आजअखेर आनंदराव बापू पाटील यांच्या चौफेर कार्याचा मला परिचय आहे . दुष्काळग्रस्त शेतकरी कष्टकरी जनतेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करून बापूंनी केलेले काम राज्याला प्रेरणादायी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर यांनी यावेळी व्यक्त केले .
आटपाडी तालुक्याच्या गत ३५ वर्षात झालेल्या प्रचंड प्रगती मध्ये आनंदराव बापू पाटील यांचा सिंहांचा वाटा आहे . प्रसिद्धी पासून दूर रहात बापूंनी दुष्काळ ग्रस्तांसाठी केलेल्या कामाचे मुल्यमापन केल्यास त्यांना राज्याच्या शासनस्तरावरून गौरविले जावे एवढे मोठे काम आनंदरावबापूंचे असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी दिला .
दुष्काळी जनता दीन - दलित ,उपेक्षित, शेतकरी कष्टकरी लोकांसाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करीत आलेल्या आनंदराव बापुंच्या चौफेर सर्वांगीण कार्याचा मी साक्षीदार असून सर्वांसाठी त्यांचेच होत समर्पणाचे जीवन जगलेल्या आनंदराव बापूंना उदंड आयुष्य लाभावेच तथापि दुष्काळाग्रस्तांच्या लिहील्या जाणाऱ्या परिवर्तनाच्या इतिहासात आनंदरावबापूंचे काम सुवर्ण अक्षरांनी लिहीले जाईल इतके प्रचंड आणि व्यापक ठरेल अशी प्रांजळ भावना पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केली .
आटपाडी तालुक्यातील इंच न इंच जमीन कृष्णामाईच्या पाण्याने भिजली पाहीजे सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या जीवनात चैतन्य फुलले पाहीजे . बंदिस्त पाईपलाईनचा पथदर्शक प्रकल्य राज्याला दिशादर्शक ठरला पाहीजे . जमीन असणारांबरोबरच जमीन नसणारांनाही कृष्णेच्या पाण्यावर हक्क असला पाहीजे आणि हा दुष्काळी भाग नजिकच्या दशकात सर्वच क्षेत्रात देशात अव्वल ठरला पाहीजे यासाठीच उर्वरीत आयुष्यात मी काम करणार आहे . ना .जयंतराव पाटील साहेबांचे सांगली जिल्ह्याबाबतचे व्हीजन ७५ सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उदगार आपल्या सत्काराला उत्तर देताना आनंदरावबापु पाटील यांनी काढले .
नेलकरंजीचे माजी उपसरपंच गोविंद भोसले, गदिमा हायस्कुल व वसंतदादा ज्यूनियर कॉलेजचे प्राचार्य अशोक पाटीलं सर , अर्जुन भोसले, किशोर पाटील, प्रकाश भोसले ,किरण देशमुख, के .के . शेख , प्रा . तानाजीराव पाटील सर,मनोज पाटील, प्रविण पाटील, बाळासाहेब यमगर, धनाजीराव बागल, प्रविण बाबर, प्रविण म्हेत्रे ,आण्णासाहेब फाटे, नितीन आसबे, उमेश ऐवळे, रोहीत सावंत हे उपस्थित होते .
