गोंदवलेत समोरासमोर मोटार सायकल धडक, तरुणाचा मृत्यू


 गोंदवले प्रतिनिधी दि 30 

     गोंदवले-नरवणे रस्त्यावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात प्रवीण मधुकर रणपिसे वय 26 रा.गोंदवले बुद्रुक ता माण यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले.

         अनिल बापूराव रणपिसे (वय ४२) व प्रवीण मधुकर रणपिसे (वय २६) हे काळेवाडी(ता.माण) कडून दुचाकी (एम एच ११-३५८५) वरून गोंदवल्याच्या दिशेने निघाले होते.त्यावेळी गजानन पाटोळे (वय३३,रा.पळशी) व विजय पाटोळे (वय४५,रा.गोंदवले बुद्रुक) हे नवीन बुलेट(नंबर नाही)वरून नरवणेच्या दिशेने निघाले होते.या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रवीण रणपिसे यांचा जागीच मृत्यू झाला.तर अनिल रणपिसे याना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वडूज येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.तर गजानन पाटोळे व विजय पाटोळे यांच्यावर दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे,हवालदार संभाजी हजारे व रवींद्र बनसोडे अधिक तपास करत आहेत.