अर्जुन पुरस्कार विजेते सुरेश जाधव यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार.





इंदापूर : प्रतिनिधी
    सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी असलेले सुयश जाधव यांनी कठोर परिश्रम,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले.भारत सरकार तर्फे देण्यात येणारा अर्जुन पुरस्कार यंदा सुयश जाधव यांना जाहिर करण्यात आला.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे त्यांचा सत्कार  करण्यात आला.   
   अर्जुन पुरस्कार विजेते सुयश जाधव यांनी अपघातामध्ये दोन हात गमावल्यानंतरही त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार,एकलव्य पुरस्कार,एक पुरस्कार आणि पदके पटकाविले आहे.त्यांनी राज्य स्तरावर ५० सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण पदकांसह आजवर १११ पदकांची कमाई केली आहे.२०१६ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयश यांनी देशाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळावीत मोठा सन्मान मिळवून दिला आहे.
    त्यांनी केलेली ही कामगिरी पाहून भारत सरकारने सुयश यांना यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर केला आहे. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे. त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे.
त्यांच्या या कामगिरीबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अर्जुन पुरस्कार विजेते सुयश जाधव यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार.