मायणी : प्रतिनिधी
मायणी दि 22
गणपती बाप्पा मोरया पुढेच्या वर्षी लवकर या असे म्हणत काही गणेश भक्तानी गत वर्षी श्री गणेशाचा निरोप घेतला परंतु ह्या वर्षी असे काही संकट येईल याची कोनाला ही कल्पना नव्हती अचानक समोर आलेल्या संकटाला सामोरे जावे लागले ह्या शिवाय कोणता पर्याय नव्हता आज कोरोना महामारी मुळे सामान्य जनता तसेच लहान मोठे व्यापारी वर्गाला आर्थिक झळ बसत आहे . मायणी मोठी बाजारपेठ आहे मायणी परिसरातुन बरेच लोक वस्तु खरेदी करण्यासाठी मायणी येथे येतात परंतु कोरोनाअसल्याने काही लोक बाहेर पडायला सुध्दा भित आहेत अश्या परिस्थितीत काही व्यावसायिकांनामात्र आर्थिक झळ बसत असल्याच चित्र या ठिकाणी दिसत आहे या मध्ये एक गाव एक गणपती काही ग्रामपंचायतीने उपक्रम राबविल्याने आज कुंभार समाजावरही आर्थिक संकट आले आहे. तसेच गणपती सिझन मध्ये
काही व्यावसायिकांनी गणपती सजावटीसाठी लागणारे साहित्यासाठी स्टाॅल उभारलेले असतात ह्या महामारी मुळे सजावट साहित्याची विक्री झाली नाही तर पुढे काय होईल हा प्रश्न व्यावसायिकांना पुढे निर्माण होत आहे . श्री गणेशाचे आगमनाच्या आगोदरच करोना नष्ट झाला पाहिजे होता असे काहीच झाले नसल्याने श्री गणेशाच्या आगमनाला कोरोना संकटाचे सावट निर्माण झाले आहे असे दिसत आहे
चौकट मायणी आणि मायणी परीसरातील व्यापारावर मंदिचे सावट,,,, मायणी हे गावं इतर परिसर साधारण पंधरा ते विस गावांचा मध्य साधणारे गाव या सर्व गावातील ग्राहकामूळे मायणी मार्केटची मोठी उलाढाल होते,, परंतू या कोरोना रोगाच्या वाढत्या रोगाच्या पार्दूभावामूळे सर्व बाहेरील ग्राहकांच्यात भितीचे वातावरण तयार झाले,, याचा मोठा परिणाम मायणी मार्केट वर झाला,,, परंतू ग्राहक बंधूंना नम्र विनंती की आपण सर्वानी प्रशासनाने दिलल्या नियमानुसार मास्क लावणे ' सॅनिटायझर वापरणे,,, कामाव्यतीरीक्त फिरू नये : महत्वाच म्हणजे जरी एखादी व्यक्ती पॉझीटीव्ह निघाली तरी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून त्याला आधार दया भिती त्याच्या मनातून काढून टाका,,, अशा सर्व गोष्टीचे पालन केले तर,,, लवकरच या रोगातून मुक्त होऊ या. धन्यवाद,,, "चंदन वरुडे
श्री गजानन इलेक्ट्रीकल्स
चांदणी चौक मायणी" पुढे मायणी गावातील मुंबई पोलीस सुजित तारळेकर म्हणाले की गणपती मध्ये गर्दी करणे टाळा दर्शनासाठी सोशल डिस्टिगंशनचे पालन करत दर्शन घ्या.