औंध(वार्ताहर):-

औंध परिसरातील वीज ग्राहकांची वाढीव वीज बिले रद्द करण्याची मागणी; अँड रणजित चव्हाण व ग्रामस्थांचे वीज वितरण अधिकार्यांना लेखी निवेदन

    मागील तीन महिन्यांंची भरमसाठ पध्दतीने आकारणी केलेली वीज बिले रद्द करून  औंध परिसरातील पंधरा गावातील
वीज ग्राहकांची वाढीव बिले माफ करावीत अशी मागणी अँड.रणजित चव्हाण व ग्रामस्थांनी एका लेखी निवेदनाद्वारे औंंध येथील वीज वितरण कंपनी कार्यालयातील अभियंत्यांकडे केली .दरम्यान औंंध येथील महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांचेशी अँड. रणजित चव्हाण, नामदेव भोसले, गणेश चव्हाण, आनंद मुळीक गणेश यादव,नवनाथ देशमुख,गणेश गायकवाड व वीज ग्राहकांनी वीज वितरणच्या वाढीव बिलाबाबत  चर्चा केली तसेच ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या व वीज वितरणच्या मनमानी कारभार तसेच वाढीव वीज बिलाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्या व ही दरवाढ तात्काळ रद्द करावी  वीज ग्राहकांच्या शासनापर्यत पोहचविण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना अँड.रणजित चव्हाण म्हणाले की, कोरोनामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी तसेच कष्टकरी वर्ग अगोदरच उध्वस्त झाला आहे. त्यात भरीस भर ही वाढीव वीज बिले आल्याने सर्वसामान्य नागरिक त्रासून गेला आहे. इलेक्टीसिटी कायदा 2003कलम56नुसार रिडींग नघेता ग्राहकांना वीज बिल देणे हे कायद्यात बसत नाही. त्यामुळे तात्काळ ही बिले रद्द करावीत. वीज ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंत तीन रुपये सेहचाळीस पैसे याप्रमाणे वीज आकारणी करावी.  वीज नियामक आयोग तसेच शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा. त्याचबरोबर कोणत्याही वीज ग्राहकाकडे वीज बिल वसुलीचा तगादा लावू नये.वीज कनेक्शन तोडू नये अशा मागण्या त्यांनी केल्या त्याचबरोबर याविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करुन वीज ग्राहकांना न्याय देणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

यावेळी नामदेव भोसले यांनी  वीज वितरण कंपनी व शासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर पुढील महिन्यात वीज वितरण कार्यालयास टाळेठोकण्याचा  इशारा दिला.