ग्रामीण भागात कोरोना चा वेग वाढला, मुंबई नंतर खेड्यात कोरोना चा धुमाकूळ.




मुंबई-
: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. परंतु, अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ आता सातारा ,सोलापूर मध्येही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.

म्हसवड शहरात पंधरा दिवस पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. समूह संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे..
म्हसवड मध्ये  एकाच कुठुंबातील नवीन पाच कोरोना रुग्ण सापडले आहेत. तीन दिवसापुर्वी येथील मुख्य पेठेतील एक व्यापारी कोविड पॉझिटीव्ह सापडला होता. या रुग्णाच्या संपर्क आलेले एकाच कुठुंबातील आणखी पाच जणाचे स्वैब रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
यामध्ये रुग्णाची दोन भाऊ,मुलगा सुन व भावाची अकरा वर्षाची मुलगी याचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,80,289 वर

दरम्यान, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. (Maharashtra covid 19 patient) गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1,80,289 वर गेली आहे. राज्यात आज 189 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2243 जण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा मृत्यू दर 4.47 एवढा झाला आहे. 79,095 एवढे Active रुग्ण आहेत.