इंदापूर येथे ऑनलाइन शिक्षण सुरू





इंदापूर : प्रतिनिधी
      कोरोना संक्रमणामुळे महाराष्ट्रात सर्वत्र शाळा बंद आहेत. यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याच धर्तीवर दिव्यांगांच्या शाळेतील मुलांना सुद्धा शिकविण्याचा उपक्रम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून इंदापूर येथील मूकबधिर निवासी शाळा  या संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गारटकर व शाळेचे मुख्याध्यापक अमोल उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली महिन्याभरापासून या शाळेतील शिक्षक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
      शाळेचे मुख्याध्यापक अमोल उन्हाळे म्हणाले की,आमच्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना अॉनलाइन शिक्षण घेण्याकरता मोबाईल लॅपटॉप व श्रवण यंत्र यांचा वापर केला जात आहे. हे शिक्षण देण्याकरता येथील शिक्षक रात्री ऑनलाइन पद्धतीने शिक्षण कसे द्यायचे या संदर्भात पूर्णपणे तयारी करत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांना सकाळी ऑनलाईन शिक्षण देवून त्याच दिवशी संध्याकाळी विद्यार्थ्यांकडून परिपाठ करून घेत आहेत.     
     इंदापूरच्या या मूकबधिर शाळेत  गेली सात वर्षांपासून ई- लर्निंग  या डिजिटल माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांना आता ऑनलाइनद्वारे शिक्षण घेताना कोणतीही अडचण येत नसल्याचे शाळेचे मुख्याध्यापक अमोल उन्हाळे यांनी सांगितले.
        या शाळेतील सर्व दिव्यांग मुले ही ग्रामीण भागातील असून आपल्या मुलांना शिक्षण मिळावे व त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी या दिव्यांग मुलांचे पालक ही जागरूक असून वेळोवेळी ते शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी विचारणा करत असल्याचे श्री. उन्हाळे यांनी सांगितले.