खरीपाच्या पेरण्या ना आला वेग, शेतकरी पेरण्यात मग्न.


........................................
 शेतकऱ्यांची  आधुनिक पेरणी यंत्राला पसंती
.......................................



पिंपोडे बुद्रुक /( अभिजीत लेंभे )कोरेगाव तालुक्यातील मागील चार-पाच दिवसांपासून मोसमी पावसाची आगमन झाले आहे हा पाऊस जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला आहे यामध्ये सुरुवातीला ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी आले व ऊस लागवडीचा प्रारंभ केला. यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी घेवडा ,सोयाबीन ,मूग ,चवळी , काळा घेवडा ,कडधान्य पिकांची पेरणी ला प्रारंभ केला आहे.
 शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी खते, बियाणे खरेदी करून पेरणीपूर्व कामे आटोपली होती . यानंतर मागील आठवड्यात पावसाने सलग हजेरी लावल्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मृग नक्षत्रात शेतकर्‍यांनी पेरणीला प्रारंभ केला मोसमी पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये  समाधानकारक झाल्याचे दिसून येत आहे.
 शेतकऱ्याने या वर्षी पाऊस वेळेवर पडल्याने पेरणीला योग्य वाफसा असल्याने अनेक छोटे-मोठे शेतकरी बैलाचे पेरणी पेक्षा ट्रॅक्टर चालणाऱ्या पेरणी यंत्रला पसंती दिली आहे
........................................
" गेल्यावर्षी 27 जून नंतर पेरणी झाली होती पण या वर्षी मृग नक्षत्रात पेरणी झाल्यामुळे पिकाला चांगला उतार मिळेल अशी आशा आहे .
श्री शंकर भगवान लेंभे (शेतकरी )
...................................
ट्रॅक्टर पेरणीयंत्र आल्यामुळे
 शेतकऱ्यांना कमी वेळ व कमी कष्ट झाल्यामुळे दिलासा मिळत आहे आम्हाला ही रोजगार मिळत आहे .
श्री. प्रदिप बबनराव काटकर
(ट्रॅक्टर मालक)