इंदापूर : वार्ताहर
इंदापूरात एकोणीस जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह
●इंदापूरकरांना मोठा दिलासा.
शहरातील दोन महिला कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकोणीस जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.त्यामुळे इंदापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या दोन महिला कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकोणीस जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.काल व आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.उद्यापासून (दि.१९ जून) संपूर्ण आठवडाभर शहरातील सर्व व्यवहार सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे.या खेरीज इंगोले मैदानावर भरणा-या मंडईवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने इंदापूरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
