भगवान कदम सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर /पत्रकारिता एक वसा, चळवळ, विचार, ध्यास म्हूणन हॅलो महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी आपली प्रामाणिक पत्रकारिता खर्ची घातल्याबद्दल *पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हूणन पुरस्कार देण्यात आला*
सचिन निकम यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी केंगार हरीश पवार बाबा काशीद अण्णा धोत्रे, विलास काळे सिद्धेश्वर काळे इत्यादी पत्रकार उपस्थित होते
मंगळवेढा तालुक्यातून सचिन निकम यांना आदर्श पत्रकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत असून एक तरुण व उमद्या पत्रकाराला पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातील पत्रकारामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.