राज ठाकरेंच्या वाढदिवसा निम्मित पत्रकारांना मास्क व फेस शिल्डचे जावली तालुका मनसेच्या वतीने वाटप




मेढा(धनंजय गोरे)


राज ठाकरेंच्या वाढदिवसा निम्मित पत्रकारांना मास्क व फेस शिल्डचे जावली तालुका मनसेच्या वतीने वाटप करण्यात आले.

-महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी तालुका मनसे च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून केळघर विभागातील पत्रकारांना फेस शिल्ड व मास्कचे वाटप करण्यात आले.
जावळी तालुका संघटक अध्यक्ष नितीन पवार ,
मनसे चे जावळी तालुका उपाध्यक्ष समीर सुर्वे,जावळी तालुका संपर्क प्रमुख सागर सुर्वे जावळी तालुका सहसचिव
अक्षय जुनघरे ,मानविसे चे जिल्हा उपाध्यक्ष
समीर गोळे विशाल जुनघरे   यांनी आज केळघर येथे पत्रकार हे फारशा सोई सुविधा अभावी कोरोना योद्धे म्हणून काम करत असल्याने सामाजिक बंधीलकीतून पत्रकारांना फेस शिल्ड व मास्कचे वाटप केले आहे.मनसे चा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे जावळी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप गाडवे यांनी यावेळी सांगितले व मनसे कार्यकर्ते यांचे आभार मानले.