जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने पिंपोडे बु। येथे वृक्षारोपण.





 पिंपोडे बुद्रुक / अभिजीत लेंभे )
 पिंपोडे बुद्रुक येथे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला पिंपोडे बुद्रुक येथील श्री सोमनाथ शिवरात्रीउत्सोह तरुण मंडळातील सदस्यांनी सोमनाथ मंदिरामध्ये वृक्षारोपण करून एक तरी वृक्ष लावा असा संदेश देण्यात आला .व त्याचे संगोपन करा . 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणासाठी निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे .
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त आपण सारे मिळून एक संकल्प करूया, पर्यावरणाचे रक्षण करून या, आपले जीवन सुरक्षित ठेवू ,या निरोगी जीवन आपुले जगूया हा संदेश देण्यात आला यावेळी प्रल्हाद  गार्डी आप्पा नानासाहेब गार्डी   व्यंकट केंजळे, गजानन अचपळ, दत्तात्रय लेंभे, गणेश महाजन संतोष कुंभार नवनाथ चव्हाण सर उदय शेठ महाजन ,अभिजीत लेंभे,  परिचय गार्डी ,दत्ता पवार उपस्थित होते