
इंदापूर : वार्ताहर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी अतुल झगडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ.भरणे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना, कार्यकर्ते यांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. अतुल झगडे हे एक आदर्श सरपंच आहेत. श्री महालक्ष्मी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी राज्यात इंदापूर तालुक्याची नविन ओळख निर्माण करून त्यांनी सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवला आहे. या त्यांच्या कार्याची दखल त्यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते यांनी मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नूतन कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच आपला धर्म मानून पक्षाचे अध्यक्ष माजी कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व खंबीर साथीने इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांना बरोबर घेऊन इंदापूर तालुक्यातील घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहचवून प्रमाणिकपणे पक्षाच्या हितासाठी काम करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्ते यांना न्याय देण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे सांगितले. यावेळी बळी बोराटे, तुकाराम करे, बजरंग राऊत, राजाभाऊ तरंगे, तात्यासाहेब वडापुरे, डॉ. पडसळकर, सचिन देवकर, विशाल बनसोडे, अजित बनसोडे, दीपक डोंबाळे, जहांगीर शेख, मारुती शेंडे, मधुकर भोसले, तुषार शेंडे, शशिकांत शेंडे, नवनाथ बोराटे, अॅड.सचिन राऊत, सचिन तरंगे, विजय झगडे, सुरेश झगडे, प्रशांत झगडे, डॉ.दादाराम झगडे, नवनाथ अभंग, सचिन अभंग, सतीश अभंग, लक्ष्मण झगडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.