म्हसवड : प्रतिनिधी-
म्हसवड नगरपालिकेने चालु वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी. तसेच नगरपालिकेने थकीत घरपट्टी वर आकारलेले व्याज माफ करावे. अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवकांनी केली आहे. याबाबत चे निवेदन म्हसवड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे यांच्या कडे दिले आहे.
यावेळी नगरसेवक अकिल काझी, नगरसेवक वसंत मासाळ,जगन्नाथ लोखंडे, गुलाबराव खाडे, आदि मान्यवर उपस्थित होते.
सध्या कोरोना संकटामुळे नागरिकांचे व्यवसाय बंद आहेत. तर यापुर्वी दुष्काळी परिस्थिती होती. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत घरपट्टी व पाणीपट्टी भरणे लोकांना शक्य नाही. रोजगार नसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच लॉकडाऊन काळात नगरपालिकेने वसुली केली नाही. व घरपट्टी व पाणीपट्टी चे मागणी नोटीस दिली नाहीत. यामुळे सदर रक्कमेवर व्याज आकारणी करण्यात येऊ नये. अशी मागणी या निवेदनात केली आहे.
या निवेदनावर रणजित येवगे, सौ. शोभा लोखंडे, सौ. कलावती पुकळे, वसंत मासाळ.सौ. सोनवणे यांच्या सह्या आहेत.
