म्हसवड-प्रतिनिधी:
कोरोना च्या संकटामध्ये वैद्यकीय क्षेत्रांमधील डॉक्टर मंडळी प्रामुख्याने अधिक चांगले काम करत आहेत.
मात्र या काम करणाऱ्या डॉक्टरांना काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बदनाम करून अफवा पसरवणाऱ्या लोकांना कडक शासन करावे व शासनाने डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
असे मत महाराष्ट्र इंजीनियर संघटनेचे चे माजी कार्याध्यक्ष सुनील पोरे यांनी माणदेशी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.
म्हसवड परिसरामधील डॉक्टर राजेंद्र मोडासे यांना काही लोकांनी हेतु पुरस्कर बदनाम केले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगले काम करणारे डॉक्टर राजेंद्र मोडासे यांना कोरोना झालेला आहे, त्यांना करोन ची लागण झालेली आहे, त्यांना कोरन्टाइन केलेले आहे.
विरळी मधील पॉझिटिव रुग्ण त्यांच्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत होता .
अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या आहेत. यामुळे त्यांच्या कुठुंबाला मनस्ताप झाला आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नळावर पाणी भरण्यासाठी शेजारच्या लोकांनी नकार दिला. हे दुर्दैव आहे.
यामध्ये वस्तुस्थिती पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
डॉक्टर राजेंद्र मोडासे यांची बहीण फलटण येथे हे हृदय विकाराच्या झटक्याने आजारी पडल्यामुळे डॉक्टर मोडसे हे फलटण येथे गेले होते .त्यांच्या बहिणीला घेऊन ते अकलूज येथे गेले व तेथे स्वतःच्या बहिणी वर उपचार करण्यासाठी ऍडमिट केले .
यादरम्यान त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ते अकलूज वरून पायाला पॅड बांधून म्हसवड ला परत आले.
आणि या दरम्यानच येथील पेशंट सापडल्याचे वृत आले.
या संधीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी डॉक्टर राजेंद्र मोडासे यांना बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरवलेले आहेत.
याबाबत म्हसवडकर यांच्यावतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. असे यावेळेला यांनी सांगितले.
तसेच शासन प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर राजेंद्र मोडासे यांना फोनवरून व प्रत्यक्ष भेटून आधार दिलेला आहे.
म्हसवडकर नागरिक डॉक्टर राजेंद्र मोडासे यांच्या पाठीशी असून म्हसवडकर नागरिकांनी अशा दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करावा. असे आवाहन केले.
यावेळी पत्रकार जेष्ठ विजय टाकणे ,अनिल व्होरा, बाबर उपस्थित होते.
यावेळी वेळी दिलेल्या मुलाखती त सुनील पोरे यांनी म्हसवड परिसरातील सर्व वैद्यकीय सेवा देणारा डॉक्टरांच्या म्हसवडकर पाठीशी आहेत असेही सांगितले.
अशा प्रकारच्या अफवा झरे येथे पसरली असून झरे येथील दवाखाने गेली दोन दिवस बंद आहेत.
दवाखाना व मेडिकल व्यवसायिक यांना पुरेशा सवलती द्याव्यात .
आणि त्यांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहावे आणि लोकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांना धडा शिकवावा. असे आवाहन म्हसवड शहरवासीयांच्या वतीने करून सुनील पोरे म्हणाले,
"आम्ही म्हसवडकर डॉ. राजेंद्र मोडासे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. "