माणनदी वाचवाः जनतेची मागणी
 नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेली माणगंगा नष्ट होण्याच्या मार्गावर
: विशाल माने / देवापुर :झं

             

      नदीपात्रात प्रामुख्याने तयार झालेली नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे वाळू .परंतु गेल्या काही वर्षात पवित्र समजल्या जाणाऱ्या व ऐतिहासिक साक्षीदार असणाऱ्या माणगंगेचे चित्रच पालटले असून सौंदर्यपूर्ण व विविधतेने नटलेल्या माणगंगेचे रूप अतिरिक्त व बेसुमार वाळू उपशामुळे बकाल झाले आहे. जे.सी.बी व पोकलेन च्या साहाय्याने १०-५० फुटाहून अधिक मोठे खड्डे महसूल विभागातील काहींच्या आशीर्वादामुळे पाहायला मिळत आहेत.त्यामुळे म्हसवड पासून राजेवाडी तलावापर्यंत नदीकाठी कुरण,झाडे नष्ट झाली असून अनेकांच्या जमिनीवरही रस्त्याच्या नावाखाली वाळूतस्करांनी शिरकाव केला आहे. नागरिकात चर्चेला ऊत आला कि तात्पुरत्या कारवाईचे नाटक केले जाते .म्हसवड ते हिंगणी हद्दीपर्यंत वाळूची बेसुमार वाळू तस्करी सुरु असताना महसूल मधील काही कर्मचारी मात्र तात्पुरत्या मलम पट्टीवर अवैध्य वाळू सम्राटांना अभय देण्याचे काम करत आहेत. यामुळे हप्तेखोरीला ऊत आला असून मा. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लक्ष्य घालण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच म्हसवड महसूल विभाग मात्र मी नाय त्यातला अन आडना लाव आतला या पोपटपंची विदूषक भूमिकेत वावरताना दिसत आहेत .या अवैध्य व्यवसायात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी कार्यरत असून गुन्हेगारी व अवैध्य वाळू व्यवसायाला खतपाणी मिळत असल्याने म्हसवड व परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते .मात्र अवैध्य वाळूउपशामुळे शासनाचा नुसता महसुलच बुडत नाही तर निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे, परिणामी माण वर दुष्काळाचे सावट येण्याचे प्रमुख कारण म्हणजे  वाळूचा बेसुमार उपसा .

         वाळूतस्करांनी महाराष्ट्र पाटबंधारे कायदा,गौण खनिज कायदा राष्ट्रीय पर्यावरण कायदा धाब्यावर बसवला आहे  नुकतीच महसूल मंत्री एकनाथ खडसें यांनी वाळूचोरीबाबत एम.पी.डी.ए अंतर्गत वाळूमाफियांवर गुन्हे दाखल करण्याची  घोषणा केली होती.तरीही मुजोर वाळूसम्राटांना कायद्यांची भीती वाटत नसून महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळेच अशा प्रवृत्तींना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे .एकीकडे माण मध्ये जलयुक्त शिवार हि योजना राबवली जाते  तर दुसरीकडे अवैध्य व्यवसायामुळे माण नदीपात्राची अवस्था वाळवंटासारखी झाली असून याकडे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्य देण्याची मागणी होत आहे  तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे माण मधील शेतकऱ्यांना दुष्काळाची मोठी किंमत मोजावी लागत आहे .

 

**** माणगंगेच्या अस्तित्वाला रक्षण कर्त्यांकडूनच धोका *****

   

             उरमोडीचे पाणी राऊतवाडीचा बंधारा भरून राजेवाडी तलावाकडे येत आहे.परंतु वाळू उचललेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे पाण्याला मार्गक्रमण करायला अडथळा येत आहे .हेच पाणी देवापुरच्या हद्दीत येण्यासाठी शेतकरी वर्ग जेसीबी च्या साहाय्याने पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु असंख्य खड्डयांमुळेच नदीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे जाणवत असून अशा गोरख धंद्याला अभय देणाऱ्या झारीतील शुक्राचार्यावर माण च्या प्रांताधिकारी श्री.दादासाहेब कांबळे यांनी कारवाईचा बडगा उभारावा अशी मागणी जोर धरत आहे.तसेच उरमोडीच्या पाण्याने महसूल विभागाची खदखद दूर होईल हि .पण जनसामान्यांच्या मनातील महसूल विभागाबद्दल असणारी खदखदीला मा प्रांताधिकारी निवारण करतील का ?व महसूल विभागाला शिस्त लावतील का ? हे येणारा काळच ठरवेल .

भरारी पथकाचा झारीतील शुर्काचार्यांना पोटसुळ .

तिन महिन्यात अवैध वाळु वाहतुक करणारी 67 वाहने पकडली ,स्थानिक कर्मचारी व वाळु तस्करांच्या कुरघोड्या .



गेल्या तिन महिन्यांपूर्वी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माण-खटाव तालुक्यातील वाळु तस्करांना लगाम घालण्यासाठी तयार केलेल्या भरारी पथकाने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता धडाकेबाज कारवाया करून जवळपास 67 वाहने पकडली या पथकाच जनतेबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनीही कौतुक केल असल तरी महसुल मधील 'झारीतील शुर्काचार्य' व वाळु माफियां यांची अभेद्र युती होऊन पथकावर कुरघोड्या सुरू केल्या असुन स्थानिक कर्मचाऱ्यांना 'पोटसुळ' का ? असा सवाल उपस्थित होत आहे .



माणतालुक्या बरोबर खटाव तालुक्यात वाळु तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला असुन वाळु तस्करी चांगलीच बोकाळली आहे , या मध्ये सांगली , सोलापूर , कोल्हापूर येथील वाळु माफियांनी येथे चांगलेच बस्तान बसवले आहे , माण तालुक्यात म्हसवड परिसरात दररोज शेकडो ट्रक वाळु परजिल्ह्यात जात आहे .या परजिल्ह्यातील वाळु तस्करांनी अनेक वेळा महसुल यंत्रणेवर जिवघेणे हल्ले केले असुन नदीकाठच्या गावचे स्थानिक तलाठ्यांना मंथली पुरवून मॅनेज केल्याची चर्चा आहे , याच्यावर पायबंद घालण्यासाठी गेल्या तिन महिन्यांपूर्वी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी एक भरारी पथक तयार केले . तद् नंतर या पथकातील कर्मचारी यांनी जवळपास 67 वाहने पकडुन कारवाई केली .या कारवाईत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे अनेक वेळा स्वतः सहभागी असतात . हि कारवाई जिवावर उदार होऊन या कर्मचारी यांनी केली असली तरी महसुल मधील काहींना मंथली मध्ये अडसर झाल्याने
पथका विषयी वाळु तस्करांना हाताशी धरून खोट्या-नाट्या पैसे घेतल्याच्या तक्रारी करून या कर्मचारी यांना बदनाम करण्याचा कुटील डाव आखला आहे . त्यात वाळु तस्कर ही पथक बंद होण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली करत आहेत .


या पथकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाया केल्याने जनतेमधुन या कारवाई चे स्वागत केल गेल होत ,उलट रात्री अपरात्री हे कर्मचारी जिवावर उदार होऊन कारवाई करत असताना या कर्मचाऱ्यांना मनोबल देण्याची गरज असुन एवढ्या मोठ्या कारवाया कधीच होऊ शकल्या नाहीत. सदर पथकांमुळे महसुल खात्याची जनमानसात मलिन झालेली प्रतिमा सुधारू शकते ,

-----------------
( चौकट )

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज !


माण-खटाव मध्ये वाळु तस्कर स्थानिक कर्मचारी यांना हाताशी धरून हजारो ब्रास वाळुचा उपसा करतात . माण मध्ये पळशी पासुन देवापुर पंर्यत लांखो ब्रास वाळुची चोरी झाली असुन या गावच्या तलाठ्यांनी किती वाहने पकडली ? येथे भरारी पथक कारवाई करत मग तलाठी गप्प का ? काही तलाठी राजकीय वजन वापरून एका गावात पाच-पाच वर्षे नोकरी कशी करतात ? असे अनेक सवाल जनतेमधुन उपस्थित होत असुन जिल्हाधिकारी यांनी स्वतः नदीची पाहणी करून अशा झारीतील शुक्राचार्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे .


-----------------

( चौकट )

पुन्हा जिवघेणा हल्ला झाल्यास जबाबदार कोण ?


केलेल्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात महसूल शासन दरबारी जमा झाला असून त्याचे पूर्ण श्रेय या पथकाचे असताना संबंधित पथकाच्या कर्मचारी याना पोटसुळीने मारहाणीच्या धमक्या, नाव बदनाम करण्याच्या धमक्या देऊन राजकीय कल देऊन, पथकातील कर्मचारी यांना त्रास देत आहेत.परंतु पथकातील कर्मचारी या कोणत्याही गोष्टींना बळी न पडता कारवाया करत आहेत. काही महिन्यांपूर्वी म्हसवड परिसरात एका कोतवालावर परजिल्ह्यातील वाळु तस्करांकडुन असाच जिवघेणा हल्ला झाला होता त्यात महसुलचा एक लाडका कर्मचारी सामील असल्याची चर्चा आहे अशी एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील अशीही विचारणा जनतेतून होत आहे..

-----------------
( टिप्स )

* पथकाकडुन तिन महिन्यात धडाकेबाज कारवाया .

* कारवाया मुळे वाळु तस्करी थंडावली .

* महसुल खात्याची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यास मदत .

* वाळु तस्कर व स्थानिक कर्मचाऱ्यांकडुन पथक पैसे घेत असल्याच्या अफवांचे पेव .

* मंथली घेणारे महसुलचे कर्मचारी पथक बंद होण्यासाठी प्रयत्नशिल .