प्रा. शाळा, कंटेकूर येथे ओम शांती ओम तर्फे नशामुक्त भारत अभियान शपथ कार्यक्रम

 प्रा. शाळा, कंटेकूर येथे ओम शांती ओम तर्फे नशामुक्त भारत अभियान शपथ  कार्यक्रम

(मुरुम प्रतिनिधी)

 नशामुक्त भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी ओम शांती ओम माध्यमातून मार्गदर्शक श्री. राजेश भाई आणि विष्णू चव्हाण यांच्या वतीने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवक व नागरिकांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

             कार्यक्रमात व्यसनांचे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर तसेच सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

           यावेळी उपस्थितांनी “व्यसनमुक्त जीवन, निरोगी जीवन” शपथ सामूहिक घेण्यात आली व नशामुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जनजागृतीपर संदेश देऊन समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनमुक्तीच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

             कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतः व्यसनांपासून दूर राहूया आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करूया, असा सकारात्मक संदेश देण्यात आला.

             कार्यक्रमास केंद्रप्रमुख बबिता महानुर, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे, सरपंच विजयाताई जमादार, शिक्षक लतिफ लदाफ, जीवन सूर्यवंशी, चित्ररेखा दंडे, लक्ष्मीबाई शिकारे शिक्षक, पालक, नागरिक व ओम शांती ओमचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रास्ताविक लक्ष्मण येवते यांनी केले तर आभार विजयकुमार कलशेट्टी यांनी मानले.