म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
म्हसवड / वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. १० जून २०२६ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली पोळ, पंचायत समिती सदस्या सौ. कल्पना विरकर, नगरपरिषद म्हसवडच्या नगराध्यक्षा सौ. पूजा विरकर, आरोग्य सभापती विजय बनगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कुलकर्णी तसेच मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबिरामध्ये १५० नागरिकांची शुगर व रक्तदाब तपासणी, १५० नागरिकांची ओरल कॅन्सर तपासणी, ५७ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी, १४ क्षयरोग (TB) स्क्रिनिंग, ८१ नेत्र तपासण्या, ५० ईसीजी तपासण्या, ३३ हिमोग्लोबिन (HB) तपासण्या, ३३ HIV तपासण्या तसेच ३३ HBsAg तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, डॉ. सुनील चव्हाण, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सुर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर तसेच प्रभारी अधिकारी डॉ. डोंबे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे सहकार्य
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. कुलकर्णी सर, डॉ. विरकर मॅडम, डॉ. पालवे मॅडम, डॉ. क्षीरसागर मॅडम, नलिनी गोंजारी, पुष्पा खुसपे, सुधीर पंडित, अजित लीटे, युवराज सानप, रामचंद्र खांडेकर, गणेश सावंत, दिपक पवार, विशाल देशमुख, अभिषेक भोसले, श्रवण गंगेकर, अनिता देशमुख, सोनाली भोसले, सारिका पिसे, कोमल कोळेकर, शिल्पा तोलणुरे, शुभांगी पिसाळ, सुप्रिया सुतार, सुजाता उगळमोगले, विश्वास शिंदे, नाना वीरकर, दत्तात्रय भोंगले, शहाजी गायकवाड, आक्काताई कोळेकर, शोएवं मुल्ला, जंगम शिरतोडे व शुभम नाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
