सातारा जिल्ह्यात पशुधन वाचवण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम यशस्वी


(अजित जगताप)  सातारा दि: सातारा जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय निमित्त प्रत्येकाच्या घरी पशुधन आहे. परंतु, नैसर्गिक बदल होत असल्याने सध्या पशुधनाची संख्या कमी झाली असली तरी त्याचे महत्व कमी झालेले नाही. सातारा जिल्हा प्रशासनाने एल निनोच्या पार्श्वभूमीवर मुबलक चारा पुरवठा करण्याच्या  भूमिकेतून चार ठिकाणी चारा बियाणे वाटप मोहीम राबवली आहे. शेतकऱ्यांनी हे चारा बियाणे घेऊन त्याची लागवड करावी. असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पावसाच्या आगमन झाल्यामुळे चारा बियाणे वाटप मोहीम यशस्वी होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

  एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीचा सावट अद्याप आहे. पावसाळा लांबणीवर पडल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहेत. मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी धडपडत आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी मुबलक आणि सकस चारा उपलब्ध करून

देणे ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे. या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 

सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी  संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजना  अंतर्गत निधी उपलब्ध केला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात उच्च दर्जाच्या चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी हे चारा बियाणे घेऊन गेले आहेत. परंतु, पाऊस लांबणीवर पडल्यामुळे अद्याप चारा बियाणाची लागवड झालेली नाही. कालपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे शिवारात आता चारा बियाण्याचेही लागवड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हिरवागार चाऱ्यामुळे खऱ्या अर्थाने पशुधन सुदृढ होणार आहे.

                महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कडून खरेदी करण्यात आलेली चारा बियाणे थेट तालुका स्तरावरील पंचायत समित्या आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांपर्यंत वितरीत झाले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा

उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय)  डॉ. दिनकर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवली जात आहे.

या मोहिमेत प्रामुख्याने हायब्रीड चारा बाजरी, गोड ज्वारी आणि मका यांसारख्या

बियाण्यांचा समावेश आहे.,  एकूण ७,३०६ किलो हायब्रीड चारा बाजरी ,१०,७२५ किलो हायब्रीड गोड ज्वारी , २५,००८ किलो हायब्रीड मका  आणि २३,१७२ किलो

हायब्रीड चारा मका बियाणे पशुपालन शेतकऱ्यांकडे वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 सातारा जिल्ह्यातील एकूण पशुधन सुमारे १२.३१ लाख आहे . जिल्ह्यात गायी, म्हशी, शेळ्या, आणि मेंढ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात . तसेच, माण, खटाव, फलटण व खंडाळा या कमी पावसाच्या तालुक्यांमध्ये मेंढीपालन आणि शेळीपालन हे प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहेत .जिल्ह्यातील पशुधनाची सविस्तर  प्रमुख पशुधनाची टक्केवारी:शेळ्या: २९.५८ टक्के, गायी/बैल: २८.६२ टक्के, म्हशी/रेडे: २६.५३टक्के, मेंढ्या: १५.०९ टक्के व इतर जनावरे (घोडे, डुकरे, गाढवे इ.): ०.१४ टक्के , 

     सातारा जिल्ह्यात एकूण ३९.०४ लाख कोंबड्या आहेत .इतर पक्ष्यांसह (बदके, टर्की इ.) एकूण कुक्कुट पक्ष्यांची संख्या ३९.८८ लाख आहे . जिल्ह्यात २३२ सहकारी संस्थांमार्फत वर्षाला सुमारे ४२६ लाख लिटर दुधाचे संकलन होते . उत्तम सेवा देण्यासाठी सातारा  जिल्हा परिषद  अंतर्गत जिल्ह्यात तब्बल १७१ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत .केंद्र सरकारच्या नियमानुसार  जिल्ह्यात नव्याने पशुगणना सुरू आहे. यामध्ये जनावरांच्या १६ प्रजाती आणि कुक्कुट पक्ष्यांची सविस्तर नोंद केली जात आहे . सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन , कृषी सभापती लता कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषद पशुसंवर्धन व जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ .विनोद पवार व संपूर्ण जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी पशुधन चारा व त्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी परिश्रम घेत आहेत. 




फोटो- पशुधनासाठी आवश्यक लागणारा चारा