सातारा दि: अनेकांची घराचे स्वप्न साकार करणाऱ्या आदर्श वास्तू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपला नावलौकिक वाढवला होता. परंतु आता या नावावर रूपाला आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला आदर्श वास्तूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने खळबळ माजली आहे. फ्लॅटचे कर्ज काढूनही आदर्श वास्तूचे कर्मचारी श्री अजय सदाशिव जाधव रा. नेले पो. किडगाव ता. जिल्हा सातारा फ्लॅट विना न्यायासाठी धडपड करत आहे.
याबाबत माहिती अशी की, सैदापूर तालुका जिल्हा सातारा येथील जमिनीवर आदर्श वास्तू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गृहप्रकल्प उभा केला होता. साठी गरजवंतांना घर विकत देण्याची जबाबदारी कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांवर लादली होती. या प्रकल्पाच्या आर्थिक तरतुदीसाठी चक्क कर्मचाऱ्यांनाच फ्लॅटवर कर्ज काढून देण्याची युक्ती शोधून काढली. कंपनीचा नावलौकिक व संचालकांच्या बोलण्याला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी ना कृषी निकाल होईना नोकरी टिकवण्यासाठी आदर्श वास्तू प्रकल्पातील चार फ्लॅटवर स्वतःच्या नावाने कर्ज काढून कंपनीला सहकार्य केले. काही काळासाठी कंपनीने हप्ते भरले. त्यानंतर हे हप्ते बंद केले. याबाबत विचारणा करण्यास गेले असता सदरचा फ्लॅट दुसऱ्यालाच नोंदणी कृती त्या विकल्याची बाब उघडकीस आली. या फसवणुकीच्या प्रकारामुळे या कंपनीत 15 वर्ष कार्यरत असणाऱ्या श्री अजय जाधव त्यांना मानसिक धक्का बसला. त्यांनी न्यायासाठी अनेकदा प्रयत्न केले. जेव्हा या फ्लॅटचे कर्ज ज्या बँकेने दिले त्या यशवंत सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना आपली पूर्ण फसवणूक झाल्याचे पोलिसांमार्फतच समजले. आता याबाबत स्वतंत्ररित्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना न्याय द्यावा यासाठी त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधितांना लेखी निवेदन दिले आहे.
आदर्श वास्तू निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड वाढे फाटा चौक, खेड तालुका
जिल्हा सातारा या नामांकित बांधकाम व्यवसाय या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष
सुनील शामराव धुमाळ, सुधाकर अनपट, विक्रम बोराटे व व्यवस्थापक प्रदीप धुमाळ यांच्या सांगण्यावरुन श्री अजय जाधव यांनी
३० मार्च २०१९ रोजी आदर्श उत्तरा फ्लॅट नंबर ७०४ सातवा मजला, सैदापूर तालुका जिल्हा सातारा या
इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्यांच्याकडे त्यावेळेला व आताही फ्लॅट खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कम असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले. तरी ही
दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा सातारा
यांच्यामार्फत अपुऱ्या कागदपत्राच्या आधारे संबंधित फ्लॅट खरेदीसाठी कर्ज देण्यात आले. काही कालावधीसाठी हे कर्ज प्रकरण असून कंपनीला मोठे कर्ज मंजूर झाल्यानंतर अजय जाधव यांचे कर्ज दिल करण्याचे असे सांगितले. त्या कर्जही नील झाले नाही व फ्लॅटरी ताबा मिळाला नाही अशी त्यांनी लिखी तक्रार केली आहे. दुर्दैवाने या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुनील
धुमाळ हे मयत झाले. त्यामुळे श्री जाधव यांच्या कर्ज प्रकरणात सर्वांनी दुर्लक्ष केले. अनेकदा तक्रार करण्यास गेलो असता त्यांची तक्रार घेतली नाही. आता सध्या याच बँकेमार्फत माझ्यावरील कर्ज व इतर चार्जेस मिळून २८ लाख १० हजार ७६९
रकमेची कर्ज प्रकरण दाखवण्यात येत आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली असून याबाबत आता सरकारनेच तोडगा काढावा अशी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान आदर्श वास्तू व दि यशवंत बँकेच्या व्यवहाराबाबत कराड पोलिसांनीच गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांच्या आरोपाला बळकटी मिळत असल्याचे मान्यता येत आहे.
__________________________________
फोटो --संबंधित आदर्श वस्तू कार्यालय
