फुले एज्युकेशन तर्फे प्राध्यापक मुलाणी– कांबळे यांचा अंतरधर्मीय 56 वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न !!!
फलटण.-फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त उच्चशिक्षित सत्यशोधिका प्रा.अॅड.करिष्मा मुलाणी , BSL.LLM,SET आणि सत्यशोधक प्रा. श्रेयस कांबळे MA .NET., लॉ. कॉलेज, फलटण यांचा अक्षत रेसिडेन्सी,जाधववाडी येथे रविवारी दि.03 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता 56 वा अंतर धर्मीय मोफत सत्यशोधक विवाह सोहळा शानदार पणे स्वताचे बंगल्यात मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
या दारक दारिकाची रजिस्टर नोंदणी करून महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पार पाडीत विधीकर्ते संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात आली . राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्थ प्रा. सुदाम धाडगे सर यांनी भारतीय उद्देशिका चे वाचन आणि महात्मा फुले रचित मंगलाष्टके चे गायन केले. यावेळी अक्षता म्हणून सुंगधी फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आले.
आयोजक व विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की दारक श्रेयस आणि दारिका करिश्मा उच्चशिक्षित असून हे लॉं.कॉलेज चे प्राध्यापक असल्याने त्यांनी स्वतः महात्मा फुले यांची २०० वी जयंती निमित्त सत्यशोधक पद्धतीने विवाह करून आपण फक्त मनुष्य जात मानतो आणि आमचा संविधानिक मुल्यांवर दृढ विश्वास आहे , हे कृतीतून दाखवून दिले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांचा हा आदर्श सत्यशोधक विवाह सत्यावर आधरित असल्याने त्याचे सर्व जाती धर्मामध्ये अनुकरण व्हावे असे देखील ढोक यांनी यावेळी आव्हान केले.
विवाहाचे सुरुवातीला फुलांच्या पायघड्यावरून दारक आणि दारिका यांचे राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान आणि समग्र वाड्मय हातात घेऊन आगमन झाले त्यानंतर दोघांचे शुभ हस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास हार अपर्ण करीत मान्यवरासह ग्रंथांचे पूजन करण्यात आले तर सर्वाना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ आणि गुलाबाचे झाड देण्यात आले तर विधीकर्त्याना मोघराचे झाड भेट देऊन स्वागत केले.
याप्रसंगी दारक श्रेयस आणि दारिका करिश्मा यांनी शपथ पत्राचे वाचन करून निसर्ग देवता आणि सर्वांचे साक्षीने निर्भय सत्यशोधक तयार करण्याचे आश्वासन देत मौलिक विचार देखील मांडत करिश्मा हिने आभार मानताना आजच साऊ संग्रह कांबळे ही दोन महिन्याची झाली म्हणून वाढदिवस साजरा करीत सावित्रीमाई यांची तयास मानव म्हणावे का ही कविता सादर केली. तर कांबळे मामीनी ज्ञानज्योती कविता सादर करून या सत्यशोधक सोहळ्यास रंगत आणली .
यावेळी लोकमतचे पत्रकार विकास शिंदे ,जेष्ठ समाजसेवक दादा कांबळे, विजय आमने आणि लॉ.कॉलेजचे विध्यार्थी विध्यार्थिनी व स्टाफ सह इतर मित्रमंडळी ,नातेवाईक मान्यवर उपस्थितीत होते.त्या सर्वांनी देखील आपले विचार मांडताना कांबळे मुलाणी यांना खरे कृतीशील वारसा स्वतः पुढे नेला म्हणून देखील अभिनंदन केले.
.
