मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.53% ,निकालात मुलींचीच बाजी

 


(मुरुम प्रतिनिधी)


येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 98.53 टक्के लागला आहे.तर सेमी माध्यमाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.शाळेने गेल्या अनेक वर्षांपासूनची निकालाची परंपरा कायम राखली आहे.या विद्यालयाचे विद्यार्थी विशेष प्रविण्यासह 148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


  यावर्षी विद्यालयातुन सेमी 136 माध्यमाच्या तर मराठी माध्यमाच्या 69 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.यात विशेष प्राविण्यासह 148 ,प्रथम श्रेणीत 45,द्वितीय श्रेणीत 8 ,तृतीय श्रेणीत 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कांबळे ऋतुजा मोहन या विद्यार्थिनीने 98.40 टक्के गुण व गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.पाटील श्रुती गणपत व पाटील कल्याणी शंकर या विद्यार्थिनींनी 96.40 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तर पाताळे सुप्रिया शरणाप्पा या विद्यार्थिनीने 95.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावले आहे.विद्यालयाचे 32 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.माजी मंत्री बसवराज पाटील,संस्थेचे अध्यक्ष बापुराव पाटील,प्राचार्य उल्हास घुरघुरे,उपमुख्याध्यापक राधाकृष्ण कोंढारे,पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे आदींसह शिक्षक शिवशरण तांबडे,बसवराज पाटील,इरफान मुजावर,सुरेश कांबळे,एम एस चव्हाण,प्रशांत मुरूमकर,पवन पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कले आहे.शहर व परिसरातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.