महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळा, वडूज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि चौथी शिष्यवृत्ती शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न

 


प्रतिनिधी विनोद लोहार

वडूज शिक्षण विकास मंडळ, वडूज संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा जोतिबा फुले पूर्व-प्राथमिक व प्राथमिक शाळा यांच्या वतीने घेण्यात आलेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि चौथी शिष्यवृत्ती शुभचिंतन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

      कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी  वडूज शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन श्री. गोविंद भंडारे, व्हा. चेअरमन श्री. विजय म्हामणे, सेक्रेटरी श्री. सचिन काळे, स्कूल कमिटी चेअरमन श्री. संतोष कांबळे यांच्यासह जेष्ठ संचालक  श्री. सतीश शेटे, श्री. संजय येवले, श्री. विश्वासराव काळे, डॉ. हेमंत पेठे, श्री.श्रीकृष्ण पेठे, श्री. नितीनकुमार जाधव, श्री. ज्ञानेश्वर पंडित, माजी चेअरमन श्री. सुभाष येवले,  श्री. अशोक भंडारे, श्री. प्रशांत शेटे, श्री. गजानन शेटे, श्री. शैलेंद्र देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

     वडूज नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली गोडसे,नगरसेवक श्री. अभयकुमार देशमुख, डाळमोडी गावच्या सरपंच सौ. निलीमा कांबळे उपसरपंच ग्रामपंचायत खटाव तालुका अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री. विजयकुमार शिंदे व वाकेश्वर गावचे सरपंच यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संचालक श्री ज्ञानेश्वर पंडित यांनी भूषविले.

   सन 2025- 26 मध्ये शाळेत राबविलेल्या मंथन, अभिरूप, आय एम विनर, अक्षरगंगा, एन. एस. एस. इ.या स्पर्धा परीक्षांना इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून या सर्व परीक्षामधून भरघोस यश मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेच्या नाव लौकिकात भर पाडली.असे उदगार प्रस्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका शितल शिंदे यांनी काढले.

     या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक वडूज शिक्षण विकास मंडळाने केले.हुतात्मा संकुलाच्या नवोपक्रमातील अतिशय दर्जेदार वह्यांचे वाटप 100 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून करण्यात आले.

      शाळेविषयी गौरवोद्गार काढत सर्वच अतिथींनी हुतात्मा संकुल व संस्थेविषयी आदर व्यक्त केला.स्पर्धेचे युग असल्याने पालक  आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत असेही ते म्हणाले.

      संस्था मनोगतामध्ये संचालक श्री. सतिश शेटे यांनी आपले विचार मांडले.प्राथमिक विभाग हे संस्थेचे लाडके अपत्य असून विद्यार्थ्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत असे ते म्हणाले.

     हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. भारती माने यांनी  मनोगतामध्ये हुतात्मा संकुलातील भावी उपक्रम व प्रगतीचे नवे आयाम यावर भाष्य केले.

     पालकांमधून श्री.काळे यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेविषयी जुन्या आठवणी व या संकुलाने घडवलेल्या विद्यार्थ्यांविषयी बोलतांना ते भावुक झाले.

     अध्यक्षीय भाषणामध्ये संचालक श्री ज्ञानेश्वर पंडित यांनी लहान मुलांना वाढवतांना स्पर्धा परीक्षासोबतचं त्यांचा सर्वांगीण विकासही तितकाच महत्वाचा असल्याचे सांगितले. चांगले ऐकणे, समजून घेणे, कृतियुक्त शिकणे याचे महत्व समजावून दिले.तसेच चौथी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांनी शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.

     नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे व नगरसेवक अभयकुमार देशमुख यांनी पुस्तक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रतीची पुस्तके भेट दिली व शाळेला वेळोवेळी यथोचित मदतीचे आश्वासन दिले.

    याप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक घटक, पत्रकार आणि पालक वर्ग, शालेय समिती सदस्य उपस्थित होते.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी विजया खराडे, अशितोष गवळी, सतीश पवार, सुवर्णा लोहार, मनीषा खाडे, सुजाता जाधव, संज्योती पवार, दिपाली टाकणे,राणी पाटोळे यांनी विशेष श्रम घेतले. 

तसेच हुतात्मा संकुलातील सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.पाहुण्यांचे स्वागत सत्कार सूत्रसंचालन श्री. घनवट सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ.जोशी मॅडम यांनी केले.