*कवी डॉ. राहुल पालके यांचे जागतिक कविता दिनी कवितांचे उत्तम सादरीकरण*
प्रतिनिधी: बार्शी
मावळत्या सूर्याला फक्त एक सांगायचे आहे,उद्याचा सूर्य पाहण्यासाठी थांबायचे आहे ...या 'उद्याचा सूर्य' या कवितेच्या ओळींनी कवी राहुल पालके यांनी तरुणाईला साद घातली. काव्य या वाङ्मय प्रकाराची माहिती देवून त्यांनी कवितांचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली. साहित्यातून समाजाचे दर्शन घडते.साहित्यविश्वात कविता हा वाड्.मय प्रकार काळानुरूप विविधांगी पद्धतीने आविष्कृत होत आलेला आहे. मानवी अंतरंगाचे साद-प्रतिसाद काव्यांमधून उलगडतात,असे प्रतिपादन कवी डॉ. राहुल पालके यांनी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात जागतिक कविता दिनानिमित्त कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच अभ्यासेतर व अभ्यासपूरक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले. कवी पालके यांचे अंगणातून नभांगणात, अबोली, निशिगंध व कर्मांजली हे काव्यसंग्रह असून त्यामधून त्यांनी विद्यार्थी विश्वाचा अथांग वेध घेतला आहे. याप्रसंगी त्यांनी तरुणाईला वेधक व बोधक अशा कवितांचे सादरीकरण केले. डिजीटल दुनिया, मी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे बोलतोय, शिवझुंज, भारत, माझे महाविद्यालय,आत्मविश्वास, माझा बाप अशा विविध विषयांवरील कवितांमधून त्यांनी विद्यार्थी व समाजमनाचा कोपरा उलगडला. मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यामधील काव्य जगताचे मंथन करताना त्यांनी कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, सूरदास, कालिदास, हरिवंशयराय बच्चन, मैथिली शरण गुप्त, भारतेंदू, विल्यम वर्डस्वर्थ, पी. बी. शेली, जॉन किटझ, येटस आदी कवींच्या काव्यलेखनाचा प्रवास उलगडला. इंग्रजी कवी रुडयार्ड किपलिंग यांच्या 'इफ', विल्यम डेव्हीस लिखित 'लेझर' व नोबेल पुरस्कार विजेते कवी रविंद्रनाथ टागोर यांच्या 'पेशन्स' या कवितांमधील ओळींची आठवण करून विद्यार्थ्यांना संयमी व ध्येयशील राहण्याचा संदेश दिला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या कवींच्या व स्वलिखित
